वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या

आई गेल्याचे दुःख आणि त्यात वडील जेवणही व्यवस्थित देत नसल्याच्या रागातून 24 वर्षीय मुलाने जन्मदात्याला संपवले. पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री दहेगाव भागात ही घटना घडली. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव आहे

वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या
औरंगाबादमध्ये मुलाकडून बापाची हत्या
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 9:54 AM

औरंगाबाद : मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना (Son Killed Father) समोर आली आहे. बापामुळेच आईने जाळून घेतले असल्याचा राग मुलाच्या मनात होता. याच भावनेतून मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad Crime) दहेगाव बंगला भागात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पित्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुलाने जीवे ठार मारल्याचं (Murder) समोर आलं आहे. वाळूज पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव, तर अनिल सोनवणे असे वडिलांचा खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग मुलाच्या मनात धुमसत होता.

काय आहे प्रकरण?

आई गेल्याचे दुःख आणि त्यात वडील जेवणही व्यवस्थित देत नसल्याच्या रागातून 24 वर्षीय मुलाने जन्मदात्याला संपवले. पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री दहेगाव भागात ही घटना घडली. कडूबाळ सोनवणे असे मयत वडिलांचे नाव असून आरोपी मुलगा अनिलला वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दहेगाव बंगला या गावात 55 वर्षीय कडुबाळ सोनवणे अनिल आणि सुनील या आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. मोठा मुलगा सुनील एका हॉटेलमध्ये काम करतो, तर धाकटा अनिल घरीच असायचा. शनिवारी रात्री सुनील हॉटेलमध्येच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास त्याला वडील आजारी असल्याचं समजलं. त्याने घरी जाऊन पाहिलं असता, त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या.

नेमकं काय घडलं?

गंभीर अवस्थेत वडील घरात पडून होते. सुनीलने याची माहिती वाळूज पोलिसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी करत कडूबाळ सोनवणेंना उपचारासाठी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आईने आत्महत्या केल्याचा राग

पोलिसांनी धाकटा मुलगा अनिलला ताब्यात घेऊन तपास सुरु केला. त्यावेळी त्याने धक्कादायक कबुली दिली. वडिलांमुळे माझ्या आईने दहा-बारा वर्षांपूर्वी जाळून घेऊन आयुष्याची अखेर केली होती. आताही ते मला नीट जेवण देत नाहीत. शनिवारी या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचा वाद झाला. त्यामुळे वडील झोपेत असताना त्यांचे पोट, छाती आणि गुप्तांगावर लाथा मारुन आपण त्यांना जीवे ठार मारले, अशी कबुली आरोपी मुलगा अनिल सोनवणे याने दिली.

संबंधित बातम्या :

पत्नीचा खून करण्यासाठी घेतले दुकानातून कटर अन् मुलीसाठी चॉकलेट, चेहऱ्यावर असंख्य वार, औरंगाबादेत पतीला अटक

पाया पडते, पण मुलाला मारू नका, आईच्या विनवण्या, मित्रांनी दया दाखवलीच नाही.. काय घडलं औरंगाबादेत?

चहा बनवताना लेकीचं डोकं उडवलं, छाटलेल्या मुंडक्यासह आई-भावाचा सेल्फी, औरंगाबादेत थरार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.