प्राध्यापकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, औरंगाबादेत खळबळ, कुठून आलं इतकं क्रौर्य?

औरंगाबादमध्ये प्राध्यापक डॉक्टर राजन हरिभाऊ शिंदे यांची हत्या करण्यात आली. शहरातील ठाकरेनगर भागात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

प्राध्यापकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, औरंगाबादेत खळबळ, कुठून आलं इतकं क्रौर्य?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 11:55 AM

औरंगाबाद : औरंगाबादेत प्राध्यापकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा चिरुन हाताच्या नसा कापत अत्यंत क्रूर पद्धतीने प्राध्यापकाची हत्या करण्यात आली. 24 तासात हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगाबादमध्ये प्राध्यापक डॉक्टर राजन हरिभाऊ शिंदे यांची हत्या करण्यात आली. शहरातील ठाकरेनगर भागात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. डॉ. शिंदेंचा गळा चिरुन, त्यांच्या हाताच्या नसा कापत अत्यंत क्रूर पद्धतीने प्राध्यापकाची हत्या केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनस्थळी दाखल झाले आहेत.

24 तासात शहरात दोन हत्या

दरम्यान, गेल्या 24 तासात हत्येच्या दोन घटना उघडकीस आल्यामुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. वाईन शॉपीवर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली होती. औरंगाबादच्या सिडको एन-8 परिसरातील विश्वास वाईन शॉपी समोर हा प्रकार घडला होता.

दारु विकत घेताना चाकूहल्ला

सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारु विकत घेत असताना एकाने येऊन त्याच्या पोटात जोराने चाकू मारला आणि आरोपी पळून गेला असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.

जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी डीसीपी दीपक दीपक गीऱ्हे, एसीपी निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी भेट दिली. आरोपीच्या शोध गुन्हे शाखा आणि इतर डीबी पथक घेत आहेत.

उत्तर प्रदेशात साधूची हत्या

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील मंदिराच्या छतावर झोपलेल्या साधूची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिरात साधूची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधूच्या मान आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी साधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.