दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू
32 वर्षीय तरुणाने आपल्या 60 वर्षीय वृद्ध पित्याला बेदम मारहाण केली आहे. यात पिता भिकन शेळके यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील दलालवादी परिसरात ही घटना घडली आहे.
औरंगाबाद : दारुच्या नशेत मुलाने आपल्या वृद्ध पित्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 60 वर्षीय वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
32 वर्षीय तरुणाने आपल्या 60 वर्षीय वृद्ध पित्याला बेदम मारहाण केली आहे. यात पिता भिकन शेळके यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील दलालवादी परिसरात ही घटना घडली आहे. विकास शेळके असं मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
ही मारहाण इतकी बेदम होती की वृद्ध पित्याच्या चेहरा आणि डोक्यातून रक्तस्राव होत होता. परिसरातही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्ध पित्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर जखमी झालेल्या पित्याचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. या खळबळजनक घटनेमुळे सध्या संताप व्यक्त होत आहे.
आईच्या हत्या करुन पळालेला मुलगा सापडला
दुसरीकडे, आईची हत्या तसेच वडिलांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुलाला तब्बल अडीच वर्षानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नालासोपारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक बाबींच्या आधारे पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आलंय. अटक आरोपीला वसई न्यायालयाने 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शेअर मार्केटमध्ये झाले होते मोठे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जन्मेश पवार आई नम्रता पवार (वय 50) तसेच नरेंद्र पवार (वय 53) हे कुटुंब नालासोपारा पश्चिम पाठणकर पार्क येथील इंपेरियल टॉवरमध्ये राहत होते. जन्मेश हा नम्रता आणि नरेंद्र पवार यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो शेअर मार्केटमध्ये पैसे लावत होता, पण यामध्ये त्याला यश येत नव्हते. शेअर मार्केटिंकमध्ये पैसा गुंतवल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले होते.
धारदार शस्त्र तसेच स्क्रुड्रायव्हरने आई-वडिलांवर हल्ला
याच कारणामुळे त्याचा आणि वडिलांचे घरात वाद झाला होता. याच वादातून 29 जानेवारी 2019 मध्ये जन्मेशने धारदार शस्त्र तसेच स्क्रुड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला होता. मुलगा आणि वडिलांचे भांडण सुरु असताना मध्ये आई आली होती. यावेळी रागाच्या भरात आरोपी जन्मेशने त्याच्या आईवरदेखील वार केले होते. यातच त्याचा आईचा मृत्यू झाला होता. तर वडील गंभीर जखमी झाले होते.
पुरावा न सोडता घरातून गेला होता पळून
आपल्या हातून मोठा गुन्हा घडल्याचे समजताच आईचा मृतदेह आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना राहत्या घरातच सोडून आरोपी जन्मेश घटनास्थळावरुन पसार झाला होता. यावेळी कोणताही पुरावा न सोडता तो बॅग घेऊन पळून गेला होता. त्यानंतर हत्या, प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील अडीच वर्षांपासून पोलीस या आरोपीचा सोध घेत होते. आरोपीने कोणताही सोडला नसल्याने त्याला पकडणे कठीण जात होते.
इतर बातम्या :
धक्कादायक ! पॅराफीन, सोयाबीन तेल मिसळून दुधाची विक्री, नाशिकमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल
पैलवानांच्या मदतीने साडेसात किलो सोन्याची लूट…तब्बल साडेतीन कोटींचा ऐवज…चोरों का राजा नाशिकचा
इलेक्ट्रिक हिटर छातीला कवटाळून आयुष्य संपवलं, विवाहितेच्या आत्महत्येने पुणे हादरलं