चेंबरमध्ये डांबून तीन कुत्र्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील घटनेने संताप
श्वानांना मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औरंगाबादमधील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान प्रेमी तरुणीने जीवाचा आटापिटा करून तीन कुत्र्यांचे प्राण वाचवले
औरंगाबाद : कुत्र्यांना (Dogs) चेंबरमध्ये डांबून जीवे ठार (Attempt to Murder) मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. औरंगाबाद शहरात ही धक्कादायक घटना (Aurangabad Crime News) घडल्याचं उघडकीस आलं आहे. श्वान प्रेमींनी चेंबरमध्ये डांबलेल्या तिघा कुत्र्यांचे प्राण वाचवले. औरंगाबाद शहरातील सिंध कॉलनीत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. तिघा श्वानांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान प्रेमी तरुणीने जीवाचा आटापिटा करून तीन कुत्र्यांचे प्राण वाचवल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
चेंबरमध्ये डांबून तिघा कुत्र्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची संतापजनक घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडल्याचं उघडकीस आलं आहे. श्वान प्रेमींनी चेंबरमध्ये डांबलेल्या तिघा कुत्र्यांचे प्राण वाचवले.
औरंगाबाद शहरातील सिंध कॉलनीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. तिघा श्वानांना चेंबरमध्ये डांबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपींची नावं समोर आलेली नाहीत. कुत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
श्वानप्रेमींमुळे तिघे कुत्रे बचावले
या प्रकरणी औरंगाबादमधील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान प्रेमी तरुणीने जीवाचा आटापिटा करून तीन कुत्र्यांचे प्राण वाचवल्याची माहिती आहे.
मुंबईत मांजरीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा
याआधी, मांजरीला मारहाण केल्या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरीला मारहाण करतानाची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. सीसीटीव्हीतून दिसलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्राणीमित्र संघटनेने तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 429 तसेच प्राणी क्रूरता अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.