मित्राची हत्या करुन खिशातल्या पाचशे रुपयांची दारु आणली, गावभर बोंबलले ‘आज दो लोगो को टपका डाला’

हत्या केल्यानंतर दारु आणून विकास राहटवड आणि संदीप मुळेकर या दोघा आरोपींनी मद्यपान केले. त्यानंतर 'आज दो लोगों को टपका डाला' असं म्हणत ते गावभर बोंबलत फिरत होते. औरंगाबाद जिल्ह्यात नक्षत्रवाडी भागात ही धक्कादायक घटना घडली

मित्राची हत्या करुन खिशातल्या पाचशे रुपयांची दारु आणली, गावभर बोंबलले 'आज दो लोगो को टपका डाला'
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 9:13 AM

औरंगाबाद : दारु पिण्यासाठी पैसे न आणल्यामुळे दोघांनी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर त्याच्याच खिशातील पैशांची दोघांनी दारु आणून मद्यपान केले. त्यानंतर ‘आज दो लोगों को टपका डाला’ असं म्हणत ते गावभर फिरत होते. औरंगाबाद जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

विकास राहटवड आणि संदीप मुळेकर या दोघा आरोपींनी मित्र महेश काकडे याची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. दारु पिण्यासाठी पैसे न आणल्यामुळे दोघांनी महेशचा खून केल्याची माहिती आहे. मित्राचा खून केल्यानंतर त्याच्याच खिशातून पाचशे रुपये काढून दोघांनी दारु आणली.

काही तासांतच दोन्ही आरोपींना बेड्या

हत्या केल्यानंतर दारु आणून विकास राहटवड आणि संदीप मुळेकर या दोघा आरोपींनी मद्यपान केले. त्यानंतर ‘आज दो लोगों को टपका डाला’ असं म्हणत ते गावभर बोंबलत फिरत होते. औरंगाबाद जिल्ह्यात नक्षत्रवाडी भागात ही धक्कादायक घटना घडली. गुन्हे शाखेने हत्येनंतर अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली.

दारुच्या वादातून तरुणाची हत्या

दुसरीकडे, दारुच्या गुत्त्यावर मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ही घटना घडली होती. सुरेंद्र आनंद पीलघर याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेश शाहु, अरुण जनमत सिंह आणि बबलू रामाधर स्लोडिया यांना अटक केली होती. मृत तरुण आणि आरोपी हे सर्व बांधकाम मजूर असून एकमेकांचे निकटवर्तीय परिचित होते. सर्व जण नियमितपणे एकत्र दारुही प्यायचे. त्यावरुनच झालेल्या वादावादीतून तरुणाची हत्या करण्यात आली होती.

दारु पिण्याच्या जागेवरुन वाद, तरुणाची हत्या

दरम्यान, दारू पिण्याच्या जागेवर बसण्याच्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मनमाड शहरातील सावित्रीबाई डेली सब्जी मार्केटच्या इमारतीत काही दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला रेल्वे स्थानकावर अटक करून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्या केल्यानंतर पळून जाणाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. किरकोळ कारणावरून खून झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. दुर्गा प्रसाद उर्फ जग्गू दादा असे आरोपीचे तर सुनील शंकर महाजन असे मृत तरुणाचे नाव होते.

संबंधित बातम्या :

दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या

मनमाडमध्ये दारु पिण्याच्या जागेवर बसण्यावरुन वाद; तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

दारु पिताना शिवीगाळ, मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे कूपनलिकेत टाकले, सांगलीत थरकाप उडवणारा प्रकार

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.