19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील ‘नगराध्यक्ष’ डॉक्टरने अश्लील चाळे केल्याचा आरोप

डॉक्टरांवरील आरोप खोटा असल्याचा दावा करत हा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी डॉक्टर संघटना आणि आरोपी डॉ. स्वरुपसिंह हजारी यांचे समर्थक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत.

19 वर्षीय तरुणीच्या सोनोग्राफीचा बहाणा, बीडमधील 'नगराध्यक्ष' डॉक्टरने अश्लील चाळे केल्याचा आरोप
बीडमध्ये डॉक्टरवरील आरोपांनंतर परिसरात गर्दी
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 1:14 PM

बीड : 19 वर्षीय तरुणीची सोनोग्राफी करण्याचा बहाणा करत थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्याविरुद्ध बीडच्या धारूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी डॉक्टर हे भाजप नेते असून धारूर नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने 19 वर्षीय तरुणीला थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

आरोप खोटा असल्याचा दावा

दरम्यान, हा आरोप खोटा असल्याचा दावा करत हा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी डॉक्टर संघटना आणि हजारी यांचे समर्थक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत.

डॉक्टर फरार, अटकेची मागणी

दुसरीकडे, आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. या प्रकरणात आरोपी डॉक्टर स्वरूपसिंह हजारी मात्र फरार असून धारूर शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.

नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून नर्सचाच विनयभंग

दुसरीकडे, मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला होता.

नागपुरात वरिष्ठ डॉक्टरकडून अतिप्रसंग

दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला होता. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला.

गोंदियात तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग

दुसरीकडे, गोंदियात राहणारी 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झाला होता. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे ही घटना घडली होती. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी लंपट डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. हरीणखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव असल्याची माहिती समोर आली होती.

संबंधित बातम्या :

वडिलांसोबत उपचारासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडूनच विनयभंग

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.