Bhandara | भारनियमनामुळे भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा संताप, वीज उपकेंद्रात तोडफोड, 150 जणांवर गुन्हा
मागील आठ दिवसांपासून पवनी तालुक्यात कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान पवनी तालुक्यातील ब्रह्मी, बाचेवाडी या गावातील सुमारे 100 ते 150 शेतकरी आसगाव वीज उपकेंद्रावर धडकले.
भंडारा : भारनियमनामुळे (Load shedding) शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रात तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. या प्रकरणी दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल (Bhandara Crime) करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील आसगाव येथे ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. वीज वितरण कंपनीच्या तक्रारीवरुन सुमारे दीडशे शेतकऱ्यांच्या विरोधात पवनी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 353, 332, 143, 504, 506 यासह शासकीय मालमत्ता विदृपीकरण अधिनियमाच्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करीत तोडफोड केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव येथे घडली आहे।याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे।या घटनेनंतर आसगाव वीज उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
मागील आठ दिवसांपासून पवनी तालुक्यात कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान पवनी तालुक्यातील ब्रह्मी, बाचेवाडी या गावातील सुमारे 100 ते 150 शेतकरी आसगाव वीज उपकेंद्रावर धडकले. प्रवेशद्वार बंद असताना शेतकऱ्यांनी उड्या मारून आत प्रवेश करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत खिडक्या, दरवाजे, खुर्च्याची तोडफोड केली.
या प्रकाराने उपस्थित कर्मचारी घाबरून गेल्याने तात्काळ पवनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ उपस्थित होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या तक्रारीवरून सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध भादंवि 353, 332, 143, 504, 506 यासह शासकीय मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
डबल, टीबल भावाने वीज खरेदी सुरू, संकट दूर होईल; भुजबळांची ग्वाही
लोडशेडिंग तत्काळ मागे घ्या, अन्यथा… खासदार इम्तियाज जलील यांनी काय दिला इशारा?
महाराष्ट्रावर वीज संकटाचे ढग? शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक;लोडशेडिंगचा फटका बसणार
Non Stop LIVE Update