Parveen Babi | परवीन बाबी राहत्या घरी सापडलेली मृतावस्थेत, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचा उपासमारीने बळी

22 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिच्या निवासी सोसायटीच्या सचिवाने पोलिसांना सूचना दिली, की तीन दिवसांपासून परवीन बाबीच्या दारातील किराणा आणि वृत्तपत्र तसेच पडून आहे.

Parveen Babi | परवीन बाबी राहत्या घरी सापडलेली मृतावस्थेत, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचा उपासमारीने बळी
Parveen Babi
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 7:39 AM

मुंबई : बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi) राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षीच तिचा मृत्यू झाला. 1970 आणि 1980 च्या दशकात आपल्या ग्लॅमरस भूमिकांसाठी परवीन बाबी ओळखली जात होती. त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होत असे, मात्र अखेरच्या क्षणी तिच्या पोटात अन्नाचा कणही गेला नसल्याचं समोर आलं जातं.

परवीन बाबीची कारकीर्द

परवीन बाबीने चरित्र (1973) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र मजबूर (1974) या चित्रपटातील नीलाच्या भूमिकेसाठी तिला पहिल्यांदा ओळख मिळाली. तिने दीवार (1975) या अॅक्शन क्राईम-ड्रामापटात अनिताची भूमिका साकारली होती. 1970 आणि 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला तिला अनेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या, विशेषतः अमर अकबर अँथनी (1977) मधील जेनी किंवा सुहाग (1979) मधील अनूची व्यक्तिरेखा, याशिवाय काला पत्थर (1979), द बर्निंग ट्रेन (1980), शान (1980), कालिया (1981) नमक हलाल (1982) अशा चित्रपटांतील तिच्या भूमिकाही गाजल्या होत्या.

अमिताभसोबत जोडी गाजली

अमिताभ बच्चनसोबत परवीन बाबीने जवळपास आठ चित्रपट केले. सर्वच्या सर्व हिट किंवा सुपरहिट ठरले होते. फिल्मफेअर, द स्टारडस्ट आणि बॉम्बे डाईंग यासारख्या प्रत्येक चित्रपट मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान तिला मिळाला होता. जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणारी ती पहिली भारतीय होती. जवळपास दहा वर्षांच्या तिच्या अभिनय कारकिर्दीत तिने पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी दहा ब्लॉकबस्टर होते. मात्र त्यानंतर ती अचानक गायब झाली. तिने 1983 मध्ये इंटिरियर डेकोरेटर म्हणून करिअरला सुरुवात केली. ती अंडरवर्ल्डच्या दबावाखाली असल्याच्याही चर्चा होत्या. चित्रपटांची संख्या कमी कमी होत असताना 1991 मध्येच तिची बॉलिवूड कारकीर्द संपुष्टात आली.

…आणि परवीनने देश सोडला

30 जुलै 1983 रोजी परवीन बाबीने भारत सोडला होता. यू. जी. कृष्णमूर्ती आणि मित्र व्हॅलेंटाईन यांच्यासोबत आध्यात्मिक प्रवासासाठी तिने विविध देशांचा दौरा केला. काही काळ तिने कॅलिफोर्निया आणि ह्यूस्टनमध्ये घालवला. नोव्हेंबर 1989 मध्ये ती मुंबईला परतली. तिला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान झाल्याची चर्चा पसरली होती, मात्र तिने हे आरोप कायमच नाकारले होते. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी अशी लेबल लावणे हे फिल्म इंडस्ट्री आणि मीडियाचे षडयंत्र होते, जेणेकरुन ते आपले गुन्हे लपवू शकतील, असं ती म्हणायची. यामुळे परवीनने तिच्या बहुतेक मित्र आणि कुटुंबियांशी संबंध तोडले आणि एकाकी जीवन जगू लागली.

दिग्गज अभिनेत्यांसोबत रिलेशनशीप

दिग्गज अभिनेता डॅनी डेन्झोन्गपा याच्यासोबत ती चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर कबीर बेदी आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबतही तिच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली. मात्र परवीनसोबत ब्रेक अप करुन भट्ट पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतले होते. परवीन बाबी अविवाहितच होती. मानसिक आरोग्य आणि मधुमेहामुळे ती अनेकदा लक्ष वेधून घेत होती. 20 जानेवारी 2005 रोजी अवयव निकामी झाल्याने परवीन बाबीचे निधन झाले.

कसा झाला मृत्यू

22 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिच्या निवासी सोसायटीच्या सचिवाने पोलिसांना सूचना दिली, की तीन दिवसांपासून परवीन बाबीच्या दारातील किराणा आणि वृत्तपत्र तसेच पडून आहे. मृतदेह सापडण्याच्या 72 तासांआधीच तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तिच्या मृत्यूचे नेमके कारण लगेच स्पष्ट झाले नव्हते.

मधुमेह बळावल्याने परवीन बाबीच्या डाव्या पायाला गॅंगरीन झाले असल्याचे आढळले होते. तिच्या बेडजवळ एक व्हीलचेअर सापडली होती, ज्यामध्ये काही चित्रे, कपडे, औषधे आणि जुनी वर्तमानपत्रे अस्ताव्यस्त पडली होती. शेवटच्या दिवसात गँगरीनमुळे तिला चालता येत नव्हतं आणि तिला फ्लॅटमध्ये फिरण्यासाठीही व्हीलचेअर वापरण्याची आवश्यकता लागत होती. कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा तिच्या पोटात तीन दिवसांपासून अधिक काळ अन्नाचा एकही कण गेला नसल्याचे दिसून आलं, परंतु काही प्रमाणात अल्कोहोल (शक्यतो तिच्या औषधातून पोटात गेलेली) सापडली होती. तिने तीन दिवसांपेक्षा जास्त काळ काहीही खाल्ले नसावे आणि परिणामी उपासमारीने तिचा बळी गेल्याची शक्यता वर्तवली गेली. पोलिसांनी घातपाताची शक्यता निकाली काढत अवयव निकामी झाल्याने आणि मधुमेहामुळे तिचा बळी गेल्याचं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

Laila Khan | अभिनेत्री लैला खानसह कुटुंबातील सहा जणांची झालेली हत्या, इगतपुरीतील बंगल्यामागे सावत्र वडिलांनीच पुरलं

Naina Sahni Tandoor Murder | विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या, नैना साहनीच्या शरीराचे तुकडे तंदूरमध्ये जाळले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.