ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने आकाश आणि प्रितेश यांच्या डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघा जखमी तरुणांना उपचारासाठी हिरे मेडिकल येथे दाखल करण्यात आले आहे.
धुळे : धुळे शहरातील एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या दोघा कर्मचाऱ्यांना टोळक्याने बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने संबंधित तरुणांच्या डोक्यात फरशी टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस प्रशासन आरोपींचा शोध घेत आहेत. खंडणी न दिल्यामुळे तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
धुळे शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सारांश भावसार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंड त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागत होते. त्यांच्या या मागणीला भावसार यांनी दाद न दिल्याने शनिवारी त्यांनी ट्रॅव्हलच्या कार्यालायत घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
नेमकं काय घडलं?
आकाश शेळके (वय 24 वर्ष) आणि प्रितेश पाटील (वय 23 वर्ष) अशा दोघांना मारहाण करण्यात आली आहे. सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने आकाश आणि प्रितेश यांच्या डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघा जखमी तरुणांना उपचारासाठी हिरे मेडिकल येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, धुळे शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली असून घटनेचा तपास करत आहेत. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात गुंडांना पोलिसांचा धाक आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संबंधित बातम्या :
पोलिसात तक्रार केल्याचा राग, व्यापारी-कर्मचाऱ्याला गुंडांची लोखंडी रॉडने मारहाण
प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत