Nurse Death | बाळंतपणात पोट फुगून इन्फेक्शन, नर्सच्या मृत्यूने बाळ पोरकं, नातेवाईकांचा डॉक्टरवर संताप

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या नर्स संध्या संतोष मोरे हिचा बाळंतपणात मृत्यू झाला. ती हिंगोली शहरातील आजम कॉलनी येथील रहिवासी होती.

Nurse Death | बाळंतपणात पोट फुगून इन्फेक्शन, नर्सच्या मृत्यूने बाळ पोरकं, नातेवाईकांचा डॉक्टरवर संताप
हिंगोलीत नर्सचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:06 PM

हिंगोली : हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळात सेवा केलेल्या परिचरिकेचा प्रसुतीनंतर मृत्यू (Nurse Death) झाला. संध्या संतोष मोरे हिने कोरोना काळामध्ये कंत्राटी परिचारिका म्हणून कर्तव्य बजावले होते. नर्सचा मृत्यू हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे (Hingoli Crime) झाल्याचा आरोप केला जात आहे. सिजरनंतर संध्या मोरेचं पोट फुगून तिला वेदना होत होत्या. पोट साफ न केल्याने इन्फेक्शन होऊन तिचा मृत्यू झाल्याचं नांदेडमधील डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेचा मृतदेह आणून ठेवला होता. त्यानंतर जबाबदार डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

काय आहे प्रकरण?

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या नर्स संध्या संतोष मोरे हिचा बाळंतपणात मृत्यू झाला. ती हिंगोली शहरातील आजम कॉलनी येथील रहिवासी होती. दोन एप्रिल रोजी हिंगोली जिल्हा सामान्य रुगणालयात तिचं सिजर झालं होतं. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सिजरनंतर संध्या मोरेचं पोट फुगून तिला वेदना होत होत्या. त्यामुळे हिंगोली जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर केलं होतं.

इन्फेक्शनमुळे नर्सचा मृत्यू झाल्याचा दावा

उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. नर्सचं पोट साफ न केल्याने तिचं इन्फेक्शन झालं. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं नांदेड येथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितल्याचा दावा केला जातो.

नातेवाईक आक्रमक

हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, म्हणून नातेवाईकांनी नर्सचा मृतदेह हिंगोली जिल्हा रुग्णालयात आणून ठेवत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र रात्री उशिरा संबंधित प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या परिचरिका संध्या मोरे यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या तरुणाचा मृत्यू! ट्रान्सप्लांट केल्यानंतर अवघ्या 3 दिवसात जीव गमावला

फोटोशूट जीवावर, नदीत बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू, नववधूची प्रकृती गंभीर

ऊसाच्या शेतातील आग विझवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.