Jalgaon Rape | जळगावात अल्पवयीन मुलीवर गँगरेप, पाच-सहा जणांनी अत्याचार केल्याचा आरोप

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गल्लीतील मैत्रीणीसोबत ती बोलत होती. त्यानंतर मात्र ती अचानक गायब झाली.

Jalgaon Rape | जळगावात अल्पवयीन मुलीवर गँगरेप, पाच-सहा जणांनी अत्याचार केल्याचा आरोप
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 8:40 AM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील (Jalgaon Crime News) एका गावात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच ते सहा जणांनी बालिकेवर गँगरेप केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी पीडितेला उचलून नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर तिला गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिल्याचा आरोप केला जात आहे. संशयित पाच आरोपी हे गावातीलच असल्याची माहिती प्राथमिक आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गल्लीतील मैत्रीणीसोबत ती बोलत होती. त्यानंतर मात्र ती अचानक गायब झाली. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, त्यामुळे सर्वत्र तिची शोधाशोध सुरु करण्यात आली. गावातील ग्रामस्थांनी आजूबाजूच्या शेतात तिची शोध मोहीम राबवली.

नेमकं काय घडलं?

अज्ञात व्यक्तींनी 13 वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला. त्यानंतर तिला गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिल्याचा आरोप केला जात आहे. अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

संशयित पाच आरोपी गावातीलच

दरम्यान, या घटनेबाबत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पाच आरोपी हे गावातीलच असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

यावेळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कैलास गावंडे यांनी भेट दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक कैलास गावंडे करत आहेत

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.