कल्याणच्या तुरुंगात दोघा कैद्यांचा जेलरवर हल्ला, टोकदार वस्तूने वार

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात बराकीची तपासणी करण्यासाठी आलेल्या जेलरसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस शिपायावर दोन कैद्यांनी हल्ला केला. एका टोकदार वस्तूने त्यांनी जेलवर वार केल्याचा आरोप आहे

कल्याणच्या तुरुंगात दोघा कैद्यांचा जेलरवर हल्ला, टोकदार वस्तूने वार
कल्याण आधारवाडी तुरुंग
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:46 AM

कल्याण : बराकीची तपासणी करण्यासाठी आलेल्या जेलरसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस शिपायावर दोन कैद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना जेलमध्ये घडली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका टोकदार वस्तूने वार केल्याची घटना घडली.

दोन्ही कैदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारे

या हल्ल्यात जेलर आनंद पानसरे यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस शिपाई भाऊसाहेब गंजवे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हल्ला करणारे दोन्ही कैदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. आता हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात बराकीची तपासणी करण्यासाठी आलेल्या जेलरसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या पोलीस शिपायावर दोन कैद्यांनी हल्ला केला. एका टोकदार वस्तूने त्यांनी जेलवर वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात महम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद आणि दिलखुश उर्फ अंकित महेंद्र प्रसाद या दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती आहे.

नागपुरात कैद्याचा सहकैद्यावर हल्ला

दुसरीकडे, पाच कुटुंबियांचा खून केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने जेलमध्ये एका कैद्यावर हल्ला चढवल्याची घटना काही दिवसांपूर्वी नागपुरात उघडकीस आली होती. त्याने कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्याला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला होता, तर ही झटापट सोडवायला गेलेल दोघे जण किरकोळ जखमी झाले होते. राजू वर्मा असे जखमी कैद्याचे तर विवेक पालटकर असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव होते. विवेक पालटकर हा पाच जणांच्या हत्येच्या आरोपात कारागृहात शिक्षा भोगत आहे.

जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने हल्ला

दरम्यान, नागपूर मध्यवर्ती कारागृहातच तीन कैद्यांनी प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केल्याचा प्रकारही काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने कैदी रोशन शेखवर वार करण्यात आले होते. हल्ल्यात कैदी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात तिघा कैद्यांनी रोशन कयूम शेख या प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. रोशन मकोको कायद्या अंतर्गत कारागृहात जेरबंद होता. रोशन कारागृहातही गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाल्याचे बोलले जात होते.

भंडाऱ्यात कैद्याची पोलिसाला मारहाण

भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने इतर कैद्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. कैदी कार्तिक बकाराम मेश्रामने कैदी किरण शिवशंकर समरीत याला उचलून जमिनीवर आपटून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी कारागृह पोलीस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी दोघांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही धक्का दिला होता. या घटनेनंतर दोन्ही कैद्यांना तुरुंग अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, तिथेही पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होत हाणामारी सुरु झाली होती. तेव्हा पुन्हा पोलीस कर्मचारी घरत यांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण मेश्रामने पोलीस कर्मचारी घरत यांचीच कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही, तर जमिनीवरील 5 ते 7 किलो वजनाचा दगड उचलत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पाच कुटुंबियांचा खून करणारा आरोपी जेलमध्ये अचानक खवळला, कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्यावर हल्ला

नागपुरात तिघा कैद्यांची प्रतिस्पर्ध्याला मारहाण, भांड्यापासून बनवलेल्या शस्त्राने जेलमध्ये हल्ला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.