गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पीडितेकडे 10 लाखांची मागणी

पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत विवाहितेवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी तिच्याकडे दहा लाखांची मागणी केली

गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पीडितेकडे 10 लाखांची मागणी
कोल्हापुरात विवाहितेवर अत्याचार
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:25 AM

कोल्हापूर : गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचाही आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

शाहूपुरी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे, तर एका संशयिताच्या पत्नीवर देखील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान बागवान आणि आरिफ शेख अशी संशयित आरोपींची नावं आहे. पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत विवाहितेवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचाही दावा केला जात आहे.

भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दरम्यान, शिवलेले कपडे आणायला जात असलेल्या दोन 11 वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. 55 वर्षीय वासनांध इसमाने दोघींना जबरदस्ती घरी ओढत नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे घडली होती.

घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास अकरा वर्षांच्या दोघी अल्पवयीन मुली शिलाई केलेले सलवार आणि अन्य कपडे आणण्यासाठी गावातीलच एका घरी जात होत्या. यावेळी आरोपीने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून नेले. त्यानंतर मारहाण करत दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले.

अल्पवयीन मुलींच्या ओरडण्याचे आवाज येताच शेजाऱ्यांनी आरोपीच्या घरातील खिडकीतून डोकावून पाहिलं असता हा प्रकार उघड झाला. या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांना होताच त्यांनी तात्काळ लाखांदूर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या :

11 वर्षांच्या दोघी मुलींवर अत्याचार, भंडाऱ्यात 55 वर्षीय आरोपीला अटक

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.