VIDEO | हळदीला मित्रांचा आग्रह, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच लग्नाच्या मुहूर्तावरच फरार

लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात काही युवक हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालत होते. मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन त्यांचा डान्स सुरु होता.

VIDEO | हळदीला मित्रांचा आग्रह, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच लग्नाच्या मुहूर्तावरच फरार
लातुरात नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 2:26 PM

लातूर : बोहल्यावरुन चढून लग्नाच्या बेड्या घालण्याच्या तयारीत असलेल्या लातूरमधील नवरदेवाला (Groom) पोलिसांच्या बेड्या पडणार आहेत. कारण लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे (Dance with Sword) नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. तर ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरदेव मात्र फरार झाला आहे. लातूर पोलीस (Latur Crime) त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात काही युवक हळदीच्या कार्यक्रमात धिंगाणा घालत होते. मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन त्यांचा डान्स सुरु होता.

हळदीच्या धिंगाण्यात पोलिसांची एन्ट्री

हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहंचले. पोलीस आल्याचं पाहताच नाचणाऱ्यांची धावपळ सुरु झाली.

सात जणांवर गुन्हा, नवरदेव फरार

तलवारी ताब्यात घेऊन पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातल्या पाच जणांना विवेकानंद पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला आहे. ऐन लग्नाच्या दिवशीच पसार होण्याची वेळ नवरदेवावर त्याच्या मित्रांमुळे आली आहे.

विवेकांनद चौक पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. हातात तलवारी घेऊन हळदीत नाचणे किंवा लग्नाच्या मिरवणुकीत नाचण्याची फॅशन लातूरमध्ये पहायला मिळत होती. आता पोलिसांच्या या कारवाईने तलवारी नाचवण्याच्या प्रकारावर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

लग्नघरावर शोककळा, वऱ्हाडाची कार नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा ‘असा’ नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!

‘भाई का बड्डे’ गाण्यावर राडा, हवेत तलवार नाचवली; जळगावात बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला इंगा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.