माहेरुन बायकोला बोलावलं, मारहाण करुन जीव घेतला, नंतर पतीचाही गळफास, कारण काय?
सिद्धेश्वर शिंदे (वय 35 वर्ष) आणि त्याची पत्नी मनिषा शिंदे (वय 27 वर्ष) यांच्यामध्ये सतत वाद होत असत. त्यामुळे मनिषा काही दिवस माहेरी जाऊन राहिली होती. दोन दिवसांपूर्वीच सिद्धेश्वरने तिला विश्वासात घेऊन गावी साकोळ इथं बोलावलं होतं.
लातूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या साकोळ इथे घडली आहे. सततच्या वादावादीनंतर माहेरी गेलेल्या पत्नीला पतीने पुन्हा नांदायला बोलावलं. त्यानंतर केलेल्या बेदम मारहाणीत छातीला जबर दुखापत झाल्यामुळे पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामुळे पतीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
काय आहे प्रकरण?
लातूर जिल्ह्यात शिरूर-अनंतपाळ तालुक्यातील साकोळमध्ये सिद्धेश्वर शिंदे आणि पत्नी मनिषा शिंदे हे आपल्या दोन मुलांसह राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात आरोपी पती सिद्धेश्वरने पत्नी मनिषा यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये छातीला जबर जखम झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर पती सिद्धेश्वर यानेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेमकं काय घडलं?
सिद्धेश्वर शिंदे (वय 35 वर्ष) आणि त्याची पत्नी मनिषा शिंदे (वय 27 वर्ष) यांच्यामध्ये सतत वाद होत असत. त्यामुळे मनिषा काही दिवस माहेरी जाऊन राहिली होती. दोन दिवसांपूर्वीच सिद्धेश्वरने तिला विश्वासात घेऊन गावी साकोळ इथं बोलावलं होतं. घटना घडली तेव्हा घरात दुसरं कोणीही नव्हतं.
चिमुरडी पोरकी
चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादात सिद्धेश्वरने मनिषाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. छातीला जबर जखम झाल्याने मनिषाचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर सिद्धेश्वरनेही घरात गळफास घेतला. या घटनेमुळे दाम्पत्याच्या मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. शिरूर-अनंतपाळ पोलीस ठाण्यात या घटने प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
कल्याणमध्ये महिलेची हत्या, पतीवर संशय
दुसरीकडे, कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे.
जेलमधून सुटलेल्या जावयाकडून सासूची हत्या
दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.
संबंधित बातम्या :
घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला
चिंचेच्या झाडामागे दबा धरला, मंदिरात जाताना बिल्डरची पहाटे तीन वाजता हत्या, विरारमध्ये खळबळ