तीन वर्षांपूर्वी विवाह, पदरात लहान मूल, माहेरी जाऊन पत्नीची निर्दयपणे हत्या

लातूर शहरातील अवंती नगर भागात राहणाऱ्या एका विवाहितेची हत्या करण्यात आली. महिलेची तिच्याच पतीने निर्दयीपणे गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये सतत भांडणं होत असल्याचा दावा केला जातो.

तीन वर्षांपूर्वी विवाह, पदरात लहान मूल, माहेरी जाऊन पत्नीची निर्दयपणे हत्या
लातुरात विवाहितेची हत्या
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 11:04 AM

लातूर : पतीनेच पत्नीची हत्या (Husband Killed Wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा चिरुन विवाहितेचा खून (Murder) करण्यात आला. लातूर शहरातील (Latur Crime) अवंती नगर भागात ही घटना घडली. रेश्मा अब्दुल शेख असं वीस वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी महिलेचा निकाह झाला होता. मात्र लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या वादानंतर विवाहिता आपल्या माहेरी गेली होती. रेश्मा आई-वडिलांसोबत राहत होती, मात्र घटनेच्या दिवशी ती एकटीच होती. पत्नी माहेरी एकटीच असल्याची संधी साधून पतीने घर गाठलं. त्यानंतर तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

लातूर शहरातील अवंती नगर भागात राहणाऱ्या एका विवाहितेची हत्या करण्यात आली. महिलेची तिच्याच पतीने निर्दयीपणे गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये सतत भांडणं होत असल्याचा दावा केला जातो. रेश्मा अब्दुल शेख (वय 20 वर्ष) असं खून करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव आहे.

तीन वर्षांपूर्वी विवाह, पदरात लहान मूल

रेश्मा आणि अब्दुल यांचा 2019 मध्ये निकाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. पती अब्दुल शेख याच्याशी रेश्माचे सतत वाद होत असल्याने रेश्मा ही आपल्या आई-वडिलांकडे राहत होती.

तीक्ष्ण हत्याराने वार

मंगळवारी रेश्माला घरात एकटे गाठून आरोपीने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी आता आरोपी पतीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

भांडणातून जावयाने सासूला विहिरीत फेकलं, 80 फूट खोल पडून 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

नागज घाटात अपघात नाही, तर हत्या; चार महिन्यांनी कोडं सुटलं, गुप्तधन न शोधल्याच्या रागातून खून

बाबा, तुम्ही आई आणि धाकट्या बहिणीला का मारलंत? 89 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाने घडाघडा कारणं सांगितली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.