मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी (Woman RFO Suicide) यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:33 AM

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी (Woman RFO Suicide) यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. तसे आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे (Maharashtra Crime News Melghat Tiger Project Forest Range Woman RFO Suicide).

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. काल (25 मार्च) सायंकाळी साडे सात वाजता ही घटना उघडकीस आली. या आत्महत्येने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे.

चार पानी सुसाईड नोट

दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात. रात्री-बेरात्री भेटायला बोलावतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे. यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. आपण गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हती, तरी मुद्दामहून तीन दिवस मालूरच्या  कच्च्या रस्त्याने फिरविले. यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोटमध्ये महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आला. काम केल्यानंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला. या आत्महत्येमुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

Maharashtra Crime News Melghat Tiger Project Forest Range Woman RFO Suicide

संबंधित बातम्या :

माशाच्या कालवणात थेलियम मिसळले, सासूचा मृत्यू, पत्नी कोमात; सद्दाम हुसेनचं पुस्तक वाचून रचला कट

Nikita Tomar Murder Case : फरीदाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल, आरोपी तौसीफ, रेहान दोषी, एकाची सुटका

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.