Mumbai Drugs | मुंबई विमानतळावर 3.98 किलो हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात अंमली पदार्थ नियामक पथकाने ही कारवाई केली. मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. जोहान्सबर्ग येथील रहिवासी असलेला आरोपी हा इथिओपियाची राजधानी आदिस अबाबाहून आला होता.

Mumbai Drugs  | मुंबई विमानतळावर 3.98 किलो हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक
मुंबई विमानतळावर हेरॉईन जप्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:37 AM

मुंबई : मुंबईत 3.98 किलो ग्रॅम वजनाचे हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अर्थात अंमली पदार्थ नियामक पथकाने ही कारवाई केली. दक्षिण आफ्रिकन नागरिकाला (South African citizen) या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई केली. बॅगेज ट्रॉलीमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे जवळपास 4 किलो वजनाचे हेरॉईन सापडले आहे. बाजारभावाप्रमाणे याची किंमत 20 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.

दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक

जोहान्सबर्ग येथील रहिवासी असलेला आरोपी हा इथिओपियाची राजधानी आदिस अबाबाहून आला होता. मुंबई विमानतळावर आल्यावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याच्या सामानाच्या तपासणीतून काहीही निष्पन्न झाले नाही, परंतु त्याच्याकडे अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्याने अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची कसून तपासणी केली आणि त्यात 3.9 किलो पांढरी पावडर म्हणजेच कथित हेरॉईन आढळून आली.

संबंधित बातम्या :

Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला

कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी, एका कॉलमुळे नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड

1 कोटी 85 लाखांचे दीड किलो ड्रग्ज जप्त, नवी मुंबईत वर्षातील सर्वात मोठी कारवाई

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.