Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर! अकरा वर्षांच्या मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नांदेडमधील घटनेने खळबळ

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

भयंकर! अकरा वर्षांच्या मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नांदेडमधील घटनेने खळबळ
नांदेड पोलीस
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 3:30 PM

नांदेड : कोरोनामुळे शाळकरी मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशातच एक भयंकर घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच (Minor Girl Rape) आहे. दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नकळत्या वयात हातात इंटनेट आल्यामुळे हा भयावह प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होत आहे. दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

तज्ज्ञ मंडळी तपास कामात

या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या शेजारीराहत असत, तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी देखील एकत्र येत असत, अशी माहिती आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने त्रास होत असल्याचे घरच्यांना सांगितले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले. मुलांकडून हा अपराध अजाणतेपणी झालाय की त्याने जाणीवपूर्वक हा गुन्हा केला, याचा तपास करणं या गुन्ह्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी पोलीस बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसह मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत. यातील अत्याचाराचा आरोप असलेल्या मुलाचे वय अवघे अकरा वर्षं असल्याने त्याला पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच कायदेशीर कारवाई होणार आहे. सध्या पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याच्या तपासासाठी तज्ज्ञ अशा वकिलांची देखील मदत घेण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मध्य प्रदेशात नात्याला काळिमा; सैनिकाच्या पत्नीवर दिराकडून 18 वर्षे बलात्कार

माजी नौदल अधिकाऱ्याचा पाच जणींवर बलात्कार, दुष्कृत्यानंतर मेसेज करायचा, ‘पुन्हा कधी येऊ?’

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.