Nanded Murder | 23 वर्षीय युवकाचे हत्या प्रकरण, तीन वर्षांपासून फरार तिघे अखेर जेरबंद

सदाशिव उर्फ सदा आनंदा किरकन नामक 23 वर्षीय तरुणाची नांदेड शहरातील बाबानगर भागात 16 एप्रिल 2019 रोजी निर्घृण हत्या झाली होती. या तक्रारीत जवळपास 9 जणांवर सदाशिव उर्फ किरकनचा खून केल्याचा आरोप होता.

Nanded Murder | 23 वर्षीय युवकाचे हत्या प्रकरण, तीन वर्षांपासून फरार तिघे अखेर जेरबंद
नांदेडमध्ये तरुणाच्या हत्या प्रकरणात तिघे जेरबंद
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:16 AM

नांदेड : तीन वर्षांपूर्वी नांदेडच्या (Nanded) बाबानगर परिसरात एका युवकाची हत्या (Murder) झाली होती. या प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेले तिघे आरोपी (Absconding) सापडले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी तिघांचा शोध घेत त्यांना अटक करण्यात यश आलं आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 16 एप्रिल 2019 रोजी सदाशिव उर्फ सदा आनंदा किरकन 23 वर्षीय या युवकाचा शहरातील बाबानगर भागात निर्घृणपणे खून झाला होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आनंदा गुणाजी किरकन यांच्या तक्रारीवरून कलम 302, 143, 147, 148, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी निखिल सुरेशसिंह चंदेल, योगेश बंकटसिंह चंदेल आणि गणेश बंकटसिंह चंदेल अशा तिघांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

सदाशिव उर्फ सदा आनंदा किरकन नामक 23 वर्षीय तरुणाची नांदेड शहरातील बाबानगर भागात 16 एप्रिल 2019 रोजी निर्घृण हत्या झाली होती. या तक्रारीत जवळपास 9 जणांवर सदाशिव उर्फ किरकनचा खून केल्याचा आरोप होता. त्यातील तीन फरार आरोपींचा शोध सुरुच होता.

तिघा आरोपींना बेड्या

शिवाजीनगरचे नूतन पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाला आरोपीला पकडण्यात आता यश आलं आहे. पोलिसांनी आरोपी निखिल सुरेशसिंह चंदेल (वय 22 वर्ष, रा. बाबा नगर नांदेड) , योगेश बंकटसिंह चंदेल (34) आणि गणेश बंकटसिंह चंदेल (34) (दोघे रा.रामनगर जुना कौठा नांदेड) अशा तिघांना अटक केली आहे.

एरवी जुनी गुन्हे फाईल बंद करण्यात पोलीस नेहमीच व्यस्त असतात, मात्र तीन वर्षांनी का होईना यातील आरोपींना अटक करुन पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडलं आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित बहिणीला भेटणाऱ्या तरुणाला ट्रकसमोर फेकलं, लेडी डॉनच्या मुसक्या आवळल्या

अनैतिक संबंधांची कुणकुण, नवऱ्याने बायकोच्याच मदतीने प्रियकराचा काटा काढला

मानोली धरणाजवळ पत्र्याची पेटी, उघडून पाहिल्यावर तिशीतील महिलेचा मृतदेह

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.