Nanded CCTV | गाड्यांच्या जाळपोळीचं सत्र नांदेडातही, पार्किंगमध्ये घुसून तीन दुचाकी पेटवल्या

नांदेड शहरात राहणाऱ्या संजय गायकवाड यांच्या घरातील पार्किंगमध्ये असलेल्या तीन दुचाकी जाळण्यात आल्या. रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

Nanded CCTV | गाड्यांच्या जाळपोळीचं सत्र नांदेडातही, पार्किंगमध्ये घुसून तीन दुचाकी पेटवल्या
नांदेडमध्ये तीन दुचाकी जाळल्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:22 PM

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत आहे. पुणे, औरंगाबादमध्ये सुरु असलेलं गाड्यांच्या जाळपोळीचं सत्र नांदेडमध्येही पसरताना दिसत आहे. नांदेडमधील गुंडाराजवरुन नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं असतानाच नांदेड शहरात घरासमोर पार्किंगमध्ये असलेल्या 3 दुचाकी एका अज्ञात व्यक्तीने जाळल्याचा (Bike Set on Fire) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनता कॉलनी मधील संजय गायकवाड यांच्या घराबाहेर ही घटना घडली. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेड शहरात राहणाऱ्या संजय गायकवाड यांच्या घरातील पार्किंगमध्ये असलेल्या तीन दुचाकी जाळण्यात आल्या. रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

ज्वलनशील पदार्थ दुचाकीवर टाकला

एक अज्ञात व्यक्ती गायकवाड यांच्या घराबाहेर आला. गेटवर चढून त्या व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ दुचाकीवर टाकला. आणि त्यानंतर दुचाकी पेटवून दिल्या.

घटना सीसीटीव्हीत कैद, स्थानिकांचा संताप

जनता कॉलनीत एका घरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराऱ्यात ही घटना कैद झाली आहे. गेटवर चढून अशाप्रकारे दुचाकींना आग लावण्यात आल्याने जनता कॉलनी भागातील नागरिक रोष व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बियाणींच्या हत्येनंतरही नांदेडमध्ये गुंडाराज कायम, सराईत गुन्हेगाराचा पोलीस पथकावर तलवार हल्ला

मध्यरात्री अज्ञात व्यक्ती आली, दुचाकी पेटवली आणि पळून गेली!

पेट्रोल भरताना सतर्क राहा! साताऱ्यात पेट्रोल भरताना बाईक पेटली, चक्क सिलिंडरच फोडावा लागला

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.