Sanjay Biyani | घराबाहेर गोळीबार ते बायकोचे आरोप, 10 मुद्द्यात बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण घ्या समजून

नांदेडकरांना कमी किमतीत फ्लॅट देणारे बिल्डर म्हणून संजय बियाणी यांची ओळख निर्माण झाली होती. साधारणतः पंधरा वर्षांपासून ते या व्यवसायात होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपल्या समाजातील 73 कुटुंबाना स्वस्तात घरे दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.

Sanjay Biyani | घराबाहेर गोळीबार ते बायकोचे आरोप, 10 मुद्द्यात बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण घ्या समजून
नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:03 PM

नांदेड : नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक (Nanded Builder Shot Dead) संजय बियाणी यांच्यावर गोळीबार होऊन 24 तास उलटले आहेत, मात्र पोलीस त्यांच्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास संजय बियाणींवर (Sanjay Biyani Murder) त्यांच्या राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं कॅमेरात कैद (Firing CCTV Footage) झालं आहे.

संजय बियाणी हत्याकांडाचा घटनाक्रम

  1. नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर गोळीबार झाला.
  2. दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी बियाणींवर चार गोळ्या झाडल्या.  गोळीबारात बियाणी आणि त्यांचा कार चालक गंभीर जखमी झाले होते. नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात बियाणींवर उपचार सुरु होते, मात्र दुपारी संजय बियाणी यांनी अखेरचा श्वास घेतला.
  3. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज दुपारी समोर आले. त्यात दोघा जणांनी जवळून त्यांच्यावर गोळीबार केल्याचे दिसते
  4. नांदेडकरांना कमी किमतीत फ्लॅट देणारे बिल्डर म्हणून संजय बियाणी यांची ओळख निर्माण झाली होती. साधारणतः पंधरा वर्षांपासून ते या व्यवसायात होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपल्या समाजातील 73 कुटुंबाना स्वस्तात घरे दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.
  5. संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती, त्यात संजय बियाणी यांचा समावेश होता.
  6. संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
  7. संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या झाल्याचा आरोप केला आहे. गुन्हेगारांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
  8. बियाणी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी कुटुंबासह त्यांच्या मित्र मंडळींनी केली आहे.
  9. संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केलं आहे, या बंदला सकाळपासूनच सगळ्याच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
  10. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 45 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Sanjay Biyani | बिल्डर संजय बियाणींचे पार्थिव पाहताच पत्नीचा टाहो, हत्येबाबत मोठा आरोप

Sanjay Biyani Firing CCTV | बिल्डर संजय बियाणींची हत्या, गोळीबाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.