Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येमागे रिंदाचा हात आहे का? पोलिसांचा अंतिम निष्कर्ष

सर्व सामान्य नागरिकांना बियाणींच्या हत्येबाबत कुठलीही खरी माहिती असेल, तर ती त्यांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नांदेडकरांना केलं आहे.

Sanjay Biyani Murder | संजय बियाणींच्या हत्येमागे रिंदाचा हात आहे का? पोलिसांचा अंतिम निष्कर्ष
नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 9:00 AM

नांदेड : नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येमागे (Sanjay Biyani Murder Case) कुख्यात गुंड रिंदा याचा हात नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. त्यामुळे आता वेगवेगळ्या दोन राज्यात बियाणी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पथकं पाठवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी (Nanded Crime) सांगितलं आहे. सर्व सामान्य नागरिकांना बियाणींच्या हत्येबाबत कुठलीही खरी माहिती असेल, तर ती त्यांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नांदेडकरांना केलं आहे.

गहाळ मोबाईल पोलिसांच्या हाती

दरम्यान, संजय बियाणी यांचा गहाळ असलेला मोबाइल पोलिसांना सापडला आहे. त्यामुळे हत्येच्या दिवशी संजय बियाणी यांचा कुणाशी संवाद झाला होता, हे मोबाइलवरून उघड होईल. त्यातून हत्येचा सुगावा लागू शकेल, अशी आशा आहे. त्यामुळे या मोबाइलच्या माध्यमातून नेमकी काय माहिती उघड होतेय, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बियाणींच्या मारेकऱ्याला तत्काळ अटक करा, वेगाने तपास करा अशी मागणी करत अवघं नांदेड एकवटलं असून अद्याप या प्रकरणी महत्त्वाचा काहीही शोध लागलेला नाही. त्यामुळे हत्येचं गूढ कधी उकलतंय, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे बियाणी हत्या प्रकरण?

5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

संबंधित बातम्या :

बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी

Sanjay Biyani | घराबाहेर गोळीबार ते बायकोचे आरोप, 10 मुद्द्यात बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण घ्या समजून

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.