Nanded Murder | नातेवाईकाच्या लग्नात किरकोळ कारणावरुन वाद, नांदेडमध्ये मित्राकडून तरुणाची हत्या

दहा दिवसांपूर्वी गोविंद शेळके आणि प्रेम उर्फ टिल्या घोटकर या दोन मित्रात वाद झाला होता. मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नात किरकोळ कारणावरुन त्यांचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन प्रेमने गोविंदाला रात्री दहा वाजता वाघोबा गल्लीत एकांतात गाठले.

Nanded Murder | नातेवाईकाच्या लग्नात किरकोळ कारणावरुन वाद, नांदेडमध्ये मित्राकडून तरुणाची हत्या
डावीकडे आरोपी प्रेम, उजवीकडे मयत गोविंदImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:43 AM

नांदेड : मित्रानेच मित्राची हत्या (Friend’s Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मित्राने ही हत्या केल्याचा आरोप आहे. नातेवाईकाच्या लग्नात दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाल्याची माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded Crime) मुखेड शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. गोविंद शेळके असं 18 वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. हत्या केल्यानंतर 20 वर्षीय आरोपी मित्र प्रेम घोटकर उर्फ टिल्या घोटकर हा फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला रात्री अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

दहा दिवसांपूर्वी गोविंद शेळके आणि प्रेम उर्फ टिल्या घोटकर या दोन मित्रात वाद झाला होता. मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नात किरकोळ कारणावरुन त्यांचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन प्रेमने गोविंदाला रात्री दहा वाजता वाघोबा गल्लीत एकांतात गाठले.

एकांतात गाठूने चाकूने सपासप वार

गोविंदवर प्रेमने चाकूने सपासप वार केल्याचं समोर आलं आहे. या चाकू हल्ल्यात गोविंद गंभीर जखमी झाला होता, स्थानिकांनी गोविंदला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारा दरम्यान गोविंदचा मृत्यू झालाय.

हत्येचा आरोपी प्रेम घोटकर हा फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला रात्री अटक केली आहे. या प्रकरणी मयत गोविंद शेळकेची आई महादाबाई शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलिसात प्रेम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

 वसईतील सुरुची बाग किनारी मृतदेह सापडला, समुद्रातून वाहत आल्याचा संशय

जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना

नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.