आजीची हत्या करुन दागिन्यांची चोरी, नांदेडमध्ये पाच दिवसात नातू जेरबंद
नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर येथे आजीचा पैशांच्या हव्यासापोटी नातवानेच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 1 डिसेंबर रोजी 75 वर्षीय अन्वरबी मैनुद्दीन शेख या वृद्ध महिलेचा घरातच खून झाला होता.
नांदेड : पैशांच्या हव्यासातून नातवानेच आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेची राहत्या घरी हत्या झाल्यानंतर दागिनेही गायब झाल्याने चोरीचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आरोपी हा नातूच निघाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर येथे आजीचा पैशांच्या हव्यासापोटी नातवानेच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 1 डिसेंबर रोजी 75 वर्षीय अन्वरबी मैनुद्दीन शेख या वृद्ध महिलेचा घरातच खून झाला होता. तिचे दागिनेही पळवल्याचा प्रकार समोर आला होता.
नेमकं काय घडलं?
अन्वरबी घरात एकटीच राहत होत्या. चोरट्याने डाव साधत तिचा खून केला आणि दागिने पळवल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत तब्बल पाच दिवसात अन्वरबीचा नातू शेख गौस याला तेलंगणातील बोधन येथून ताब्यात घेतले.
लाकडाने डोक्यात मारुन आजीचा खून
चौकशी दरम्यान, शेख गौसने गुन्ह्याची कबुली देत पैसे, दागिन्यांसाठी लाकडाने डोक्यात मारुन आजीचा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेख गौस हा आजी अन्वरबीच्या घराजवळच राहत होता. खुनाच्या घटनेनंतर तो फरार होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली
संबंधित बातम्या :
दहा दिवसांच्या मुलीचा अडीच लाखांना सौदा, नवी मुंबईत जन्मदात्रीसह पाच जणांना बेड्या
अहमदनगरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या, मध्यरात्री दगड घालून संपवलं