Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या, नांदेडमध्ये खळबळ

विद्या सुंकवाड यांनी 22 मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पंजाब लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. 23 मार्च रोजी सकाळी त्या उठून बाहेर गेल्या आणि पुन्हा आपल्या रुमवर परत आल्या

Nanded | महिला डॉक्टरची लॉजमध्ये आत्महत्या, नांदेडमध्ये खळबळ
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 7:55 AM

नांदेड : महिला डॉक्टरने लॉजमध्ये आत्महत्या (Lady Doctor Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकरची रहिवासी (Bhokar Nanded) असलेल्या महिला डॉक्टरने नांदेड शहरातील पंजाब लॉजमध्ये (Suicide in Lodge) आयुष्याची अखेर केली. विद्या अमोल सुंकवाड असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. लॉजमधील रुमचा दरवाजा बराच वेळ न उघडल्यामुळे व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावलं, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

विद्या सुंकवाड यांनी 22 मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पंजाब लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. 23 मार्च रोजी सकाळी त्या उठून बाहेर गेल्या आणि पुन्हा आपल्या रुमवर परत आल्या. मात्र 24 मार्च रोजी सकाळी त्या बाहेर न आल्यामुळे लॉजच्या व्यवस्थापनाने दार वाजवले, तेव्हा आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

लॉजच्या रुममध्येच आयुष्य संपवलं

काही वेळानंतर पुन्हा एकदा लॉज व्यवस्थापनाने दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पंजाब लॉज व्यवस्थापनाने वजिराबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी दार तोडले तेव्हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

संबंधित बातम्या :

खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा

 ‘जीवनदायिनी’ वैनगंगा ठरतेय ‘मृत्यूवाहिनी’, दीड वर्षांत नदीत 17 आत्महत्या

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.