बाईकचा धक्का लागल्याने वाद, चाकू हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू, नांदेडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना
बाईकचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड जिल्ह्यातील चिखली गावात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगनपुरा भागात हत्येची ही घटना घडली आहे.
नांदेड : किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाईकचा धक्का लागल्याने बाईकस्वारावर चाकूने वार (Bike Rider Attack) करण्यात आले होते. या हल्ल्यात मयत तरुणाचा भाऊसुद्धा जखमी झाला आहे. नांदेड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे (Nanded Crime) एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी तरुणाला मोटरसायकलचा धक्का लागला. या प्रकारावरुन वाद झाल्यानंतर धक्का लागलेल्या पादचाऱ्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील चिखली गावात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. अनिल शेजुळे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव (Youth Murder) आहे. आरोपींनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
बाईकचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड जिल्ह्यातील चिखली गावात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगनपुरा भागात हत्येची ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
एका अनोळखी युवकाला मोटारसायकलचा धक्का लागल्याने त्याने दुचाकीस्वार अनिल शेजुळे याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. यामध्ये अतिरक्तस्राव झाल्याने अनिलचा मृत्यू झाला.
याच चाकू हल्ल्यात अनिलचा भाऊ राजकुमार हा देखील किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा तपास सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
जिने ममतेने भरवला घास, नराधमाने तिचाच केला घात; मध्य प्रदेशात पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या
कॉफी हाऊसमध्ये बसलेल्या 27 वर्षीय तरुणावर हल्ला, सांगलीतील हत्याकांडाने खळबळ
अनैतिक संबंधाच्या रागातून तरुणाला चाकूने भोसकले, पीडितेच्या आईचा संताप अनावर