कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
उस्मानाबादमधील सांजा चौक या भागात राहणाऱ्या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ अनुराधा गरड यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उस्मानाबाद : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उस्मानाबाद शहरातील गरड हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
रुग्ण महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. उस्मानाबादमधील सांजा चौक या भागात राहणाऱ्या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ अनुराधा गरड यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण आहे.
आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, नातवाचा रुग्णालयात राडा
दुसरीकडे, उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकाने हॉस्पिटलमध्ये राडा घातल्याचा प्रकार नुकताच पिंपरी-चिंचवडमधून समोर आला आहे. आजीच्या मृत्यूनंतर नातवाने दारुच्या नशेत गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शिवीगाळ करत तरुणाने कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हॉस्पिटलमध्ये राडा घालणाऱ्या नातवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकाने हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ केली, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पुणे जिल्ह्यातील देहू रोड मधील युनिकेअर हॉस्पिटल येथे घडली होती. आरोपी नातू तुषार सुरेश चव्हाण याच्या विरोधात देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी तुषार चव्हाण याची आजी बेशुद्ध पडल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत युनिकेअर हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचार सुरु असताना तुषारच्या आजीचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर तुषार याने दारुच्या नशेत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडाओरडा करून हॉस्पिटलमध्ये उपस्थित डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाण केली. या मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
संबंधित बातम्या :
दाढ काढल्यानंतर 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर चुकीच्या उपचारांचा आरोप
आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, दारु पिऊन नातवाचा पुण्यातील रुग्णालयात राडा, डॉक्टरांना मारहाण