AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 5 लाखांचा गुटखा जप्त

पुण्यात चाकण पोलीस अवैध गुटखा विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे (Chakan Police Seized Gutkha Cost Of Rs 5 Lakh).

अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, 5 लाखांचा गुटखा जप्त
Gutkha
| Updated on: Mar 16, 2021 | 9:41 AM
Share

पुणे : पुण्यात चाकण पोलीस अवैध गुटखा विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे (Chakan Police Seized Gutkha Cost Of Rs 5 Lakh). चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दी बाहेरुन गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच टेम्पो ही जप्त करण्यात आला आहे (Maharashtra Crime News Pune Chakan Police Seized Gutkha Cost Of Rs 5 Lakh).

या कारवाईत तब्बल 5 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आणि साडे तीन लाखाचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल चाकण पोलिसांनी जप्त केला आहे.

चाकणमधील नाणेकरवाडी येथे एका पान टपरीवर कारवाई करुन पोलिसांनी 8 हजार 850 रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईत गुटखा विक्रेता आरोपी नीरज बन्सल याला ताब्यात घेऊन गुटख्याच्या पुरवठादार याबाबत चौकशी केली होती. तेव्हा आरोपी अंकुर गुप्ता यांच्याकडून गुटखा आणल्याचे आरोपी बंसल यांनी सांगितले. त्यानुसार शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथून पोलिसांनी मोकळ्या जागेतून आरोपी गुप्ता यांचा तीन चाकी टेम्पोसह गुटखा जप्त केला आहे.

नीरज बंसल याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुख्य आरोपी अंकुर गुप्ता सध्या फरार आहे (Maharashtra Crime News Pune Chakan Police Seized Gutkha Cost Of Rs 5 Lakh).

नांदेडमध्येही 41 लाखांचा गुटखा जप्त

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात एका ट्रकमधून जाणारा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुटखा भरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. या धाडीत पोलिसांनी एकूण 41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे माफियांनी हा गुटखा कापसाच्या आड लपून ठेवला होता.

Maharashtra Crime News Pune Chakan Police Seized Gutkha Cost Of Rs 5 Lakh

संबंधित बातम्या :

केडीएमसी अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची मोठी कारवाई

बीडचं झेंगाट भारी, एकाची नाही 8 जणांची नवरी, वरात थेट ठाण्याच्या दारी !

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.