Sangli Accident | दोन गाड्यांची समोरासमोर धडक, दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
सुदर्शन निकम, तसेच कपिल झांबरे आणि त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे यांना अपघातात प्राण गमवावे लागले. तर अपघातातील वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले
सांगली : दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने सांगलीत भीषण अपघात झाला. यामध्ये एका दाम्पत्यासह तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये विट्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल झांबरे आणि धनश्री झांबरे हे दाम्पत्य असा तिघांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास खेराडे येथून विट्याकडे येत होते. तर तासगाव तालुक्यातील डोंगर सोनी येथील कपिल माणिक झांबरे आणि त्यांच्या पत्नी आपल्या नातेवाईकांसह तासगावहून पुणे येथे निघाले होते.
यावेळी कडेगाव तालुक्यातील नेवरी गावात या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जबर होता, की या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातातील वाहनांचा चक्काचूर
सुदर्शन निकम, तसेच कपिल झांबरे आणि त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे यांना अपघातात प्राण गमवावे लागले. तर अपघातातील वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. या मोठ्या अपघातानंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :
Gorai Car Accident | भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू
नोटा मोजताना आयकर विभागाचे हात दुखले, मशीन मागवली, घरात 150 कोटींचे घबाड?
ड्रेनेजमध्ये सहकारी पडला, एकामागून एक सहा जण वाचवायला गेले, चौघांवर काळाचा घाला