कॉफी हाऊसमध्ये बसलेल्या 27 वर्षीय तरुणावर हल्ला, सांगलीतील हत्याकांडाने खळबळ
सांगलीत तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगली कॉलेज कॉर्नर येथील दडगे हायस्कूलच्या पाठीमागे असणाऱ्या एका कॉफी हाऊसमध्ये 27 वर्षीय तरुणावर सपासप वार करण्यात आले.
सांगली : तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Youth Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षीय तरुणाची सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. सांगलीत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ (Sangli Crime) उडाली आहे. सांगली कॉलेज कॉर्नर येथील दडगे हायस्कूलच्या पाठीमागे असणाऱ्या एका कॉफी हाऊसमध्ये हा प्रकार घडला. नवनाथ लवटे (राहणार संजयनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. नवनाथची हत्या नेमकी कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एका हल्लेखोराने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर 5 ते 6 वेळा सपासप वार करुन हल्ला केल्याचा आरोप आहे. या हत्येचं नेमकं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.
काय आहे प्रकरण?
सांगलीत तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगली कॉलेज कॉर्नर येथील दडगे हायस्कूलच्या पाठीमागे असणाऱ्या एका कॉफी हाऊसमध्ये 27 वर्षीय तरुणावर सपासप वार करण्यात आले. नवनाथ लवटे असे मयत तरुणाचे नाव आहे. तो सांगलीतील संजयनगर परिसरात राहत होता.
नेमकं काय घडलं?
हल्लेखोराने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर 5 ते 6 वेळा सपासप वार करुन हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ला झाल्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
घटनास्थळी विश्रामबाग पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळावरुन हल्लेखोर पसार झाले असून नवनाथची हत्या नेमकी कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हत्येचं नेमकं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.
संबंधित बातम्या :
अनैतिक संबंधाच्या रागातून तरुणाला चाकूने भोसकले, पीडितेच्या आईचा संताप अनावर
हरियाणात अल्पवयीन मुलीची हत्या करुन बलात्कार, दोषींना फाशीची शिक्षा
जिने ममतेने भरवला घास, नराधमाने तिचाच केला घात; मध्य प्रदेशात पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या