#क्राईम_किस्से : Amruta Deshpande | एकतर्फी प्रेमातून सांगलीच्या अमृता देशपांडेची झालेली हत्या, तेवीस वर्षांनंतरही अंगावर शहारे आणणारी घटना

अमृताला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अमृताच्या शरीरावर वीसपेक्षा जास्त वेळा चाकूचे वार होऊन रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

#क्राईम_किस्से : Amruta Deshpande | एकतर्फी प्रेमातून सांगलीच्या अमृता देशपांडेची झालेली हत्या, तेवीस वर्षांनंतरही अंगावर शहारे आणणारी घटना
अमृता देशपांडे हत्या प्रकरण
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 7:36 AM

सांगली : सांगलीच्या अमृता देशपांडे (Sangli Amruta Deshpande Murder Case) हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. 18 वर्षांच्या अमृता देशपांडेवर 2 सप्टेंबर 1998 रोजी आरोपी बबन राजपूत याने धारदार चाकूने सपासप वार केले होते. हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. सांगलीच्या शास्त्री चौकात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. हत्या होताना पाहूनही आसपासच्या रहिवाशांनी, दुकान चालकांनी दारं-खिडक्या बंद केल्याचं बोललं जातं.

दुर्मीळात दुर्मीळ असलेली ही केस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढवली होती. यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या बबन राजपूत शिक्षा भोगून बाहेर पडला असून एका कोल्ड ड्रिंकच्या दुकानात काम करत असल्याची माहिती आहे. त्याने आपलं पदवी शिक्षणही तुरुंगातूनच पूर्ण केलं.

कोण होती अमृता देशपांडे?

डॉ. रवीकांत देशपांडे आणि अर्चना देशपांडे यांच्या दोन कन्या, मोठी रेश्मा, तर धाकटी 18 वर्षांची अमृता. ती सांगलीतील गरवारे कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होती.

2 सप्टेंबर 1998 चा दिवस. अमृताची मैत्रीण सुमेधा दुपारी दोन वाजता त्यांच्या घरी आली होती. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. अमृताला मेंदीचा कोन आणायचा होता. सायकलवर शर्ट-जीन्स घालून ती निघाली, तर मैत्रीण सुमेधा तिच्यासोबत चालत होती. दोघींच्या गप्पा सुरुच होत्या. साधारण अर्ध्या तासाने सुमेधा गेली.

पोलिसांना फोन आला

रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास सांगली पोलिसांना फोन आला. शास्त्री चौकातील उद्योग भवनाजवळ एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. पोलिसांनी तातडीची पावलं उचलत घटनास्थळाकडे धाव घेतली.

दुसरीकडे, एका व्यक्तीने पाहिलं की ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली युवती तर डॉक्टरांची मुलगी अमृता आहे. तो दुचाकीवरुन तडक अमृताच्या घरी गेला आणि तिच्या आईला घेऊन घटनास्थळी आला. अमृताला रुग्णालयात न्यायला कार आणण्यासाठी तो परत गेला. येताना वाटेत त्याने डॉक्टर देशपांडे म्हणजेच अमृताच्या वडिलांनाही घेतलं. ते परत आले तर अमृता तिथे नव्हती, मात्र रक्ताचे डाग दिसत होते. चौकशी केल्यावर समजलं की तिला सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

दरम्यान, अमृताला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अमृताच्या शरीरावर वीसपेक्षा जास्त वार होऊन रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

प्रत्यक्षदर्शी काय सांगतात?

अमृता सायकलवरुन जात असताना दोन तरुणांनी तिला अडवलं आणि मारहाण केली. त्यानंतर आपल्या खिशात लपवलेला चाकू काढून त्यांनी तिच्यावर सपासप वार केले, ती आरडाओरड करत होती, मदतीसाठी याचना करत होती, मात्र यावेळी हल्ला होताना पाहूनही आजूबाजूच्या लोकांनी आपापली घरं बंद केली, टपरी चालकांनी दुकानं बंद केली होती. तिच्या मदतीसाठी संबंधित साक्षीदार गेला, पण तोपर्यंत आरोपी पळून गेले. लोक तिच्या मदतीला येण्यास घाबरत होते.

पोलिसांनी पंचनामा केला, तेव्हा घटनास्थळावर चपलेची जोडी, चाकूचे आवरण आणि अमृताची सायकल सापडली होती. पोलीस आसपास चौकशीसाठी गेले, तरी लोकांनी दरवाजे उघडले नाहीत, असं सांगितलं जातं. पुढे तपासात तीन नावं समोर आली. बबन उर्फ शंकर उदयसिंह राजपूत, अनिल गोविंद शिंदे आणि मुकुंद गोविंद शिंदे. हे तिघेही फरार झाले होते. मात्र हत्येच्या दोन दिवसांनी म्हणजेच चार सप्टेंबरला एका पाईपलाईनमध्ये लपून बसलेल्या बबनला पोलिसांनी संध्याकाळी अटक केली. सहा तारखेला दुसरा आरोपी अनिल शिंदे, तर सात तारखेला तिसरा आरोपी मुकुंद शिंदे सापडले.

हत्येचं कारण काय?

आरोपी बबन राजपूत हा अमृताच्या घरासमोर राहत होता. दोघांमध्ये आधी मैत्री होती, मग प्रेम जुळल्याचंही बोललं जातं. बबनकडून तिला लग्नाची मागणी घालण्यात आली. मात्र तिने स्पष्ट नकार दिला. तिच्या नकारामुळे तो वेडापिसा झाला. त्याने तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने सांगितलं की मला शिक्षण-करिअर करायचं आहे, मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही. तो जवळपास सहा महिने तिच्या मागे-मागे करत होता. मात्र तिच्याकडून त्याला टाळण्याचा प्रयत्न होत होता. मनधरणी आणि विनवणी यांचं रुपांतर अखेर धमकीत झालं. माझ्याशी लग्न कर, माझी नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही, लग्न केलंस तर तुझ्या नवऱ्याला मारुन टाकेन, अशी धमकीही त्याने अमृताला दिली होती. मात्र त्याच्या वेडेपणाने अखेर अमृताचाच बळी घेतला.

संबंधित बातम्या :

बॅडमिंटनपटू सय्यद मोदीची 26 व्या वर्षी झालेली हत्या, पत्नी-प्रियकर होते संशयाच्या भोवऱ्यात

लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.