वाळू तस्कराचा हल्ला, गाडीचे दरवाजे डंपरमध्ये घुसले, महिला तहसीलदार वाहनात अडकून

सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाळू तस्कराकडून हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री तहसीलदार बी एस माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकासह गेल्या असताना हा प्रकार घडला

वाळू तस्कराचा हल्ला, गाडीचे दरवाजे डंपरमध्ये घुसले, महिला तहसीलदार वाहनात अडकून
आटपाडीच्या तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्लाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 1:35 PM

सांगली : आटपाडीच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाळू तस्कराकडून हल्ला (Attack) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli) आटपाडी-मुढेवाडी रोडवर रात्रीच्या सुमारास वाळू तस्करानी हल्ला केल्याचा आरोप आहे. आटपाडी तालुक्याचे तहसीलदार बी एस माने यांच्या मोटारीवर डंपर घालून तहसीलदारांना (Tehsildar) जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरुप आहेत. मात्र डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. तर डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

नेमकं काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाळू तस्कराकडून हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री तहसीलदार बी एस माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकासह गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे समजले. पथकाने त्याचा पाठलाग केला. तर अचानक डंपरने चकवा दिला.

महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप

त्याच ठिकाणी थोड्या वेळ गस्त घालत असताना मुंढेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि तहसीलदार यांच्या गाडीवर डंपर घातला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप आहेत. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. तर डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

संबंधित बातम्या :

धुळ्यात भरदिवसा ‘ खाकी ‘ रक्तबंबाळ, बाईकला कट मारल्याचा वाद, PSI वर चाकूहल्ला

जेसीबीनं तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न, वाळूमाफियाच्या कृत्यानं वैजापुरात खळबळ!

चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकाचे हल्लेखोर अटक, हटकल्याच्या रागातून केला होता हल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.