किरकोळ भांडणातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकललं, साताऱ्यात अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार

साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला उकळत्या चुन्यात ढकलून नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे.

किरकोळ भांडणातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकललं, साताऱ्यात अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:48 PM

सातारा : किरकोळ वादातून तरुणासोबत अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला आधी बेदम मारहाण (Student beaten up) करण्यात आली. त्यानंतर त्याला उकळत्या चुन्यात ढकलण्यात आले. सातारा शहरातील रविवार पेठेत (Satara Crime) हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. समाधान मोरे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे. तर नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी समाधानला मारहाण करत कळत्या चुन्यात टाकल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या युवकाचे शरीर ठिकठिकाणी भाजले आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला उकळत्या चुन्यात ढकलून नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे.

विद्यार्थ्याला अनेक ठिकाणी भाजले

मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर अनेक ठिकाणी भाजले आहे. क्षुल्लक कारणातून ही मारहाण झाल्याची बाब समोर येत आहे. त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara Man beaten up

साताऱ्यात तरुणाला मारहाण करुन उकळत्या चुन्यात टाकलं

आरोपी मद्यधुंद असल्याचा दावा

मारहाण करणारे संशयित हे दारु प्यायलेले असल्याचे तक्रारदाराचा दावा आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

गुंडांच्या दोन गटात मारहाण, नागपुरात रात्री अपहरणाचा थरार; पुढे आरोपी आणि मागे पोलिसांचा ताफा

नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा

Video | मारहाण करत जवानाला लुटले; आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.