Sindhudurg VIDEO | पाणी प्रश्नी आवाज उठवल्याचा राग, सिंधुदुर्गात ग्रामस्थाला सरपंचाची मारहाण
गावच्या सरपंचाने शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्गात समोर आला आहे. पाणी प्रश्नी आवाज उठवल्याच्या रागातून ग्रामस्थाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.
सिंधुदुर्ग : पाणी प्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाला त्या गावच्या सरपंचाने शिवीगाळ करुन मारहाण (beaten up) केली. सिंधुदुर्गात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Sindhudurg Crime) आहे. शिवीगाळ आणि मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आकेरी गावातील ही घटना असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात सरपंचाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकेरी गावातील पाणी प्रश्न सदाशिव माने या ग्रामस्थाने उठवला होता. याचा सरपंचाला (Sarpanch) राग आला आणि त्याने मानेंना वाटेतच अडवले. सावंतवाडी बाजारातून बाजार करुन परत येत असताना सरपंचाने मानेंना वाटेत अडवत शिवीगाळ करुन मारहाण केली.
काय आहे प्रकरण?
गावच्या सरपंचाने शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्गात समोर आला आहे. पाणी प्रश्नी आवाज उठवल्याच्या रागातून ग्रामस्थाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आकेरी गावातील ही घटना असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात सरपंचाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
आकेरी गावातील पाणी प्रश्न सदाशिव माने या ग्रामस्थाने उठवला होता. सरपंचाला याचा राग आला आणि त्याने मानेंना वाटेतच अडवले. सावंतवाडी बाजारातून बाजार करुन परत येत असताना सरपंचाने मानेंना वाटेत अडवत शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे.
शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या सरपंचांवर आणि मारहाण होताना उपस्थित असून देखील बघ्याची भूमिका घेणाऱ्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
CCTV | सीसीटीव्ही लावल्यावरुन वाद, सोसायटी सदस्यांनी बापलेकाला केलेली मारहाणही सीसीटीव्हीत कैद