ताडीच्या अतिसेवनाने घात, डोंबिवलीत दोघा मित्रांचा मृत्यू, रुग्णालयात जाईपर्यंतच प्राण सोडले

डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते.

ताडीच्या अतिसेवनाने घात, डोंबिवलीत दोघा मित्रांचा मृत्यू, रुग्णालयात जाईपर्यंतच प्राण सोडले
ताडीच्या अतिसेवनाने दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 2:51 PM

डोंबिवली : ताडीचे अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके अशी दोन मयत तरुणांची नावं आहेत. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता, मात्र दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ताडी विक्रेता रवी भटनी याचा शोध सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख, स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.

रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू

त्यांच्या मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ताडीचे अतिसेवन केल्याने प्राण गमावले

दरम्यान या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले. मयत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ताडी पिऊन इतर दोन जणांची तब्येत सुद्धा खालावली होती, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात, औरंगाबादेत 25 वर्षीय डॉक्टरसह चौघांवर गुन्हा

अंगणात कोंबड्या आल्यावरुन वाद, बारामतीत महिलेची निर्घृण हत्या

केरळमध्ये बायकोंची अदलाबदल करणारं मोठं रॅकेट, परपुरुषांशी लैंगिक संबंधांसाठी हजारोंचा पत्नीवर दबाव

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.