इतर पर्यटक पाहून उत्साह वाढला, पोहण्यासाठी तलावात उतरला, शेवटी…

काल गटारी साजरी करीत असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या एका तरुणाचा देखील खालापूर येथे मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी...

इतर पर्यटक पाहून उत्साह वाढला, पोहण्यासाठी तलावात उतरला, शेवटी...
palghar news
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 3:44 PM

खालापूर : काल महाराष्ट्रात (Maharashtra crime news) अनेक पर्यटन ठिकाणी अनेकांनी गटारी साजरी केली. धबधब्याजवळ (pune khalapur news) अनेकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात काल अनेक घटना घडल्या आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण नदी, तलाव, धबधब्यांवर पावसाळी सहलीचा आनंद घेत होते. खालापूर तालुक्यातील नढाळ तलावातही (nadhal lake) अनेक पर्यटक पोहण्याचा आनंद घेत होते. त्याचवेळी मुंबईतील एका अति उत्साही व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला. ज्यावेळी त्या तरुणाचा मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईतील धारावी येथील विनोद गजाकोश आपल्या मित्रांसोबत गटारी सेलिब्रेशन करण्यासाठी नढाळ तलावावर गेला होता. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यामुळं नढाळ तलाव दुथडी भरून वाहतो. त्या पाण्यात पोहण्यासाठी विनोद गजाकोश उतरला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला पाण्याच्या बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, तहसिलदार आयुब तांबोळी यांनी चौकचे मंडळ अधिकारी किरण पाटील, सहायक पोलिस निरीक्षक युवराज सुर्यवंशी यांना सूचना दिल्या. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि एक पथक दाखल झालं होतं. त्यानंतर त्या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती. मात्र अंधार पडेपर्यंत विनोद गजाकोशचे यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा टीमने शोधकार्य सुरु केले.

हे सुद्धा वाचा

आज सकाळी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

त्या परिसरात प्रशासनाने कलम १४४(१) लागू केला आहे अशी माहिती मिळाली आहे. म्हणजे तिथल्या तलावाजवळ जाण्यास बंदी घातली आहे. परंतु तिथं पर्यटक अधिक गर्दी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. बंदी असताना सुध्दा लोकं जमा होत असल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.