Jalgaon Accident | अरुंद रस्त्यावर कारची धडक, दोघा बाईकस्वार तरुणांचा मृत्यू

जळगावातील परवेज निसार खाटीक आणि आमीर जाकीर खाटीक या दोघांचा मृत्यू झाला. दोघे जण भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरुंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

Jalgaon Accident | अरुंद रस्त्यावर कारची धडक, दोघा बाईकस्वार तरुणांचा मृत्यू
जळगावात अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 3:29 PM

जळगाव : कारच्या धडकेत दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू (Bike Accident) झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. जळगाव-भुसावळ रोडवरील (Jalgaon Bhusawal Road) दूरदर्शन टॉवरजवळ हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत शनिवारी दोघा जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातामुळे रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, तर रात्री उशिरापर्यंत रुग्णालय परिसरात गर्दी पहावयास मिळाली. तरुणांना दुचाकीने उडवल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

जळगावातील परवेज निसार खाटीक आणि आमीर जाकीर खाटीक या दोघांचा मृत्यू झाला. दोघे जण भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरुंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

एकाचा जागीच मृत्यू, एकाचा उपचारादरम्यान

ही धडक इतकी जबरदस्त होती, की परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

नातेवाईकांचा आक्रोश

अपघाताची माहिती मिळताच दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. परिसरात नातेवाईकांचा आक्रोश ऐकायला मिळाला. तरुणांना दुचाकीने उडवल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सने कारला नेले फरफटत; तिहेरी अपघातात 1 ठार, 2 गंभीर

विनाड्रायव्हरची गाडी पुणे-नाशिक महामार्गावर, गाडीचा हँडब्रेक लावायला विसरल्यास काय होतं? पाहाच

धावत्या बसखाली अचानक दुचाकी घुसली, एसटीने क्षणात घेतला पेट, प्रवासी बचावले, दुचाकीस्वार जखमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.