Goa | जळगावहून मित्रांसोबत गोव्याला, लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

भुसावळ ते गोवा बुलेटवर मित्रांसोबत प्रवास करत गोव्याला फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गोव्यातील समुद्रात बुडून तरुणाला प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे.

Goa | जळगावहून मित्रांसोबत गोव्याला, लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा बुडून मृत्यू
भुसावळचा तरुण गोव्यातील समुद्रात बुडालाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 1:40 PM

जळगाव : मित्रांसोबत गोव्याला (Goa) फिरायला गेलेल्या तरुणाचा दुःखद अंत झाला. समुद्रात बुडून तरुणाला प्राण (Drown in Sea) गमवावे लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. गोव्याला सर्व मित्र बुलेटवरुन (Bullet Ride) स्वारी करत गेले होते. मयत तरुण मूळ जळगावमधील भुसावळचा रहिवासी होता. मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. विवेक सुरेश मुराई असं मयत तरुणाचं नाव आहे. विवेक रेल्वे विभागातील सीनियर शिक्षण इंजिनिअर पदावर कार्यरत होता.

बुलेटने गोव्याला प्रवास

भुसावळहून मित्रांसोबत बुलेट बाईकने प्रवास करत गोव्याला फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गोव्यातील समुद्रात बुडून तरुणाला प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे.

विवेक सुरेश मुराई हा रेल्वेच्या सिनिअर सेक्शन विभागात इंजिनिअर होता. गोव्याला सर्व मित्र फिरायला गेले होते. गोव्याला पोहोचल्यानंतर आईशी फोनवर बोललाही होता.

समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेला

विचारपूस करून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी समुद्रात उतरला, मात्र समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

किस्सा नहीं, कहानी बन गई; शेततळ्यांवरील व्हिडीओसाठी फेमस, अमरावतीच्या जोडगोळीचा बुडून मृत्यू

नाल्यात पोहताना दोन विद्यार्थी बुडाले, मित्र पळून गेले, रात्री मृतदेह सापडले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.