सूर्यास्ताचे फोटो काढताना पाय निसटला, 14 वर्षांचा मुलगा महाबळेश्वरच्या दरीत कोसळला

महाबळेश्वर मधील लॉडविक पॉइंटवर फोटो काढताना 14 वर्षीय तरुण दरीत कोसळला. आदित्य जाधव असे त्या युवकाचे नाव आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.

सूर्यास्ताचे फोटो काढताना पाय निसटला, 14 वर्षांचा मुलगा महाबळेश्वरच्या दरीत कोसळला
महाबळेश्वरमध्ये तरुण दरीत कोसळला
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:42 AM

सातारा : उगवत्या आणि मावळत्या सुर्याचे फोटो कॅमेरात कैद करण्याची हौस अनेकांना असते. मात्र दरी-खोऱ्यात जाऊन निसरड्या वाटांवर बाळगलेली हलगर्जी अंगलट येण्याची शक्यता असते. सूर्यास्ताचे असेच अनोखे क्षण (Sunset Photo) कॅमेरात टिपण्याच्या नादात तरुण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वरमधून दिसणारे नयनरम्य सनसेटचे छायाचित्र काढण्याचा मोह 14 वर्षीय मुलाला (Minor Boy) चांगलाच महागात पडला. फोटो काढताना दरीत कोसळून हा अल्पवयीन मुलगा दुखापतग्रस्त झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar Satara) या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या लॉडविक पॉईंटला ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने शर्थीचे प्रयत्न करुन युवकाला बाहेर काढले.

काय आहे प्रकरण?

महाबळेश्वर मधील लॉडविक पॉइंटवर फोटो काढताना 14 वर्षीय तरुण दरीत कोसळला. आदित्य जाधव असे त्या युवकाचे नाव आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.

दरीत पडून युवक जखमी

सनसेट दृश्याचे फोटो काढताना तोल जाऊन अचानक तो दरीत कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने शर्थीचे प्रयत्न करून युवकाला बाहेर काढले. जखमी युवक अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जीव धोक्यात घालू नका

दरी-खोऱ्यात ट्रेकिंगला जाऊन धोकादायक सेल्फी किंवा फोटो काढण्याचा हल्ली ट्रेण्ड आला आहे. सोशल मीडियावर अधिकाधिक लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक हौशी ट्रेकर्स नसती धाडसं करुन फोटोग्राफी करतात. मात्र पर्यटकांनी धोका पत्करुन अशी कुठलीही कृत्य करु नयेत, ज्यामुळे तुमच्या जीवावर बेतेल, असे आवाहन पोलीस आणि महाबळेश्वर पालिका प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या :

चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, महाबळेश्वरमधील पतीला जन्मठेपेची शिक्षा

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह 11 जणांवर गुन्हे

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार, महाबळेश्वर हादरलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.