Exam Scams: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्यांचा तपास आता ED करणार ; पुणे सायबर पोलिसांनी सोपिवली महत्वाची कागदपत्रे

पोलिसांसह ईडी देखील या परीक्षा घोटाळा प्रकरणात समांतर तपास केला जाणार आहे. ईडीकडून पाच लाखांच्या पुढील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा समांतर तपास केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांसह या तिन्ही पेपरफुटी प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

Exam Scams: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्यांचा तपास आता ED करणार ; पुणे सायबर पोलिसांनी सोपिवली महत्वाची कागदपत्रे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 11:41 PM

मुंबई : महाराष्ट्रतील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्यांचा( Exam Scams) तपास आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ED करणार आहे. राज्यात गाजलेला म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी परीक्षा घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे वर्ग करण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे सायबर पोलिसांनी या घोटाळ्याच्या तपासासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे ईडीकडे सोपिवली आहेत. यामुळे महाराष्ट्रात आणखी एका मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ईडीने या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती मागितली आहे.

पोलिसांसह ईडी समांतर चौकशी करणार

पोलिसांसह ईडी देखील या परीक्षा घोटाळा प्रकरणात समांतर तपास केला जाणार आहे. ईडीकडून पाच लाखांच्या पुढील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा समांतर तपास केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांसह या तिन्ही पेपरफुटी प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

परीक्षा आयोजीत करणाऱ्या कंपनीनेच पेपर फोडले

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्या पथकाने या तिन्ही गैरव्यवहार प्रकरणांचा कसून तपास केला. उच्चपदस्थ अधिकारी आणि परीक्षा आयोजनाची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या वरिष्ठांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात या तिन्ही परीक्षांचे पेपर फोडून, परीक्षेच्या निकालांमध्ये फेरफार करून उमेदवारांना पात्र ठरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणला परीक्षा घोटाळा; एकूण 60 जणांना अटक

पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेच्या संदर्भात झालेला घोटाळा उघडकीस आणला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवले होते आणि या प्रकरणी सगळी कागदपत्रे मागवली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण 60 जणांना अटक केली असून त्यातील अनेक जण जामिनावर बाहेर देखील आले आहेत.

घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग

या परीक्षा घोटाळ्यात अनेक बडे अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली होती. तिन्ही परीक्षा भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत आता इडीदेखील या प्रकरणी संपूर्ण चौकशी करणार आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना उघड झाला म्हाडा आणि टीईटी परीक्षा घोटाळा

पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. त्यानंतर टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाला. या टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती.

आरोग्य विभागतही असा झाला घोळ

आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा शोध घेत पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले हे यातील मुख्य आरोपी आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शिवाजीनगर न्यायालयात 3800 पानांचे आरोपपत्रदेखील दाखल केले होते. याचाही सध्या तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणांची दखल आता ईडीने घेतली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.