Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीवरुन काढल्याचा राग उफाळला, आरोपींनी पती-पत्नीला संपवले; तितक्यात मोलकरीण पोहचली अन्…

समीर आहुजा आणि शालू आहुजा या पती-पत्नीची हत्या करुन आरोपी घरात होते. तितक्यात मोलकरीण सपना तेथे पोहचली. आरोपींनी तिलाही संपवले.

नोकरीवरुन काढल्याचा राग उफाळला, आरोपींनी पती-पत्नीला संपवले; तितक्यात मोलकरीण पोहचली अन्...
नोकरीच्या वादातून दिल्लीत तिहेरी हत्याकांड
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 9:07 PM

नवी दिल्ली : नोकरीवरुन काढल्याचा राग मनात धरुन तिहेरी हत्याकांड केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पश्चिम दिल्लीतील अशोक नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सचिन आणि सुजित अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपीसह अन्य आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.

समीर आहुजा, शालू आहुजा आणि सपना अशी मयत तिघांची नावे आहेत. तिघांचीही चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. समीर आहुजा आणि शालू आहुजा या पती-पत्नीची हत्या करुन आरोपी घरात होते. तितक्यात मोलकरीण सपना तेथे पोहचली. आरोपींनी तिलाही संपवले.

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून हत्याकांड

शालू आहुजा ब्युटी पार्लर होते. दहा दिवसांपूर्वी शालूने मुख्य आरोपी आणि त्याच्या मैत्रिणीला नोकरीवरुन काढून टाकले होते. तसेच दोघांसोबत गैरवर्तन केले. याचाच राग मनात धरुन आरोपींनी आपल्या साथीदारांसह हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

हत्याकांडात 4 ते 5 आरोपींचा समावेश असून दोघांना अटक केली आहे. अन्य फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस म्हणाले.

हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील किंमती ऐवज लुटला

चार मजली घराच्या तळमजल्यावर पार्किंगमध्ये शालू आणि सपना यांचा मृतदेह आढळला, तर समीरचा मृतदेह वरच्या मजल्यावर होता. हत्या केल्यानंतर आरोपींनी लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरले.

पोलिसांनी अटक आरोपींकडून आयफोन 13, गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त केला आहे.

पोलीस चोरीचा पंचनामा करण्यास गेले असता हत्येची घटना उघडकीस

मंगळवारी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना चोरी झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा घटनास्थळी पोलिसांना तीन मृतदेह आढळले. एक वर्षापूर्वीच हे कुटुंब विकासपुरीतून या भागात रहायला आले होते.

तीन वर्षाची मुलगी सुखरुप

घटना घडली तेव्हा दाम्पत्याची तीन वर्षाची मुलगी दुसऱ्या खोलीत झोपली होती. सुदैवाने मुलगी सुखरुप आहे.

आरोपी सीसीटीव्हीत कैद

आरोपी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन बाईकवरुन आरोपी आल्याचे आणि हत्या करुन ते 9 वाजण्याच्या सुमारास निघताना दिसत आहेत.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.