गणेशोत्सवात हनुमान बनून नाचत असलेल्या कलाकाराचा स्टेजवर मृत्यू! घटनेचा Live Video समोर

रवी शर्मा नावाचा एक कलाकार हनुमान बनून नाचत होता. नाचता नाचता तो पुढे चालत गेला. त्याचे पाय थिरकतच होते. पण एका क्षणी तो थांबला. मागे फिरला. शेवटी लाल कपड्यावर येऊन तो खाली बसला आणि तिथेच आडवा झाला.

गणेशोत्सवात हनुमान बनून नाचत असलेल्या कलाकाराचा स्टेजवर मृत्यू! घटनेचा Live Video समोर
हनुमानाच्या वेशातील कलाकाराचा नाचताना मृत्यूImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 11:38 AM

आयुष्यातली कोणती संध्याकाळी शेवटची ठरेल, हे कुणीच सांगू शकत नाही. गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका कलाकाराचा मृत्यू झाला. घटनेचा व्हिडीओ (Hanuman Video Death) जेव्हा समोर आला, तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय. ही घटना मैनपुरीमध्ये (Mainpuri, Uttar Pradesh) घडली. एका मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जात होता. त्यात हनुमानाच्या (Hanuman Death) वेशात एक कलाकार नाचत होता. पण अचानक तो जागेवरच कोसळला. मंदिरातील भाविकांसमोरच काही क्षणांपूर्वी नाचत असलेल्या या कलाकाराला भोवळ आली आणि तो जागेवरच आडवा झाला. यातच या कलाकाराचा मृत्यू झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला.

लोकांना वाटलं अभिनय करतोय…

असंख्य भाविक गणेश मंडपात हजर होते. या लोकांसमोर हनुमानाचा वेश परिधान केलेला कलाकार नाचत होता. जेव्हा तो अचानक सगळ्यांसमोर पडला, तेव्हा लोकांना वाटलं की तो अभिनय करतोय. पण तसं नव्हतं. बराच वेळ त्यानं काहीच हालचाल केली नाही, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे.

हे सुद्धा वाचा

अखेर गणेश मंडपातील लोकांनी या कलाकाराला उचललं. डॉक्टरांकडे नेलं. रुग्णालयात डॉक्टरांनी जेव्हा या व्यक्तीला तपासलं, तेव्हा त्याचा आधीच मृत्यू झालेला होता. डॉक्टरांनी कलाकाराचा मृत्यू झालाय, हे सांगताच, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीत घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली.

पाहा व्हिडीओ :

मैनपुरीच्या कोतवाली क्षेत्रात बंशीगौरा परिसरात एक शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात होता. शनिवारी संध्याकाळी भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. असंख्य भाविकही या भजन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात रवी शर्मा नावाचा एक कलाकार हनुमान बनून नाचत होता. नाचता नाचता तो पुढे चालत गेला. त्याचे पाय थिरकतच होते. पण एका क्षणी तो थांबला. मागे फिरला. शेवटी लाल कपड्यावर येऊन तो खाली बसला आणि तिथेच आडवा झाला. यानंतर रवी शर्मा या कलाकाराच्या शरीराने हालचालच केली नाही. रवी शर्मा याच्या अकाली मृत्यूने त्याच्यासोबतच्या इतर कलाकारांनी दुःख व्यक्त केलंय. तर दोन मिनिटं आधी ज्याला नाचताना पाहिलं, त्याचा मृत्यू झालाय, यावर विश्वास ठेवणं लोकांनाही जड गेलंय.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.