मालेगावात व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण

शहरात गेल्या दोन दिवसात दोन व्यावसायिकांना लुटल्याचे (Thief) धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. शहरातील नवीन बस स्थानका जवळील मुन्ना गॅरेजच्या ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन लॉकरमधील 21 लाख 13 हजार 630 रुपयांची रोकड चोरुन (Money Robbery) नेली आहे.

मालेगावात व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण
मालेगावात गॅरेजमध्ये चोरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 5:27 PM

मालेगाव : शहरात वाढत्या गुन्हेगारीने नागरिक हैराण झाले आहेत. भरदिवसा लुटमार सुरु झाल्याचे (malegaon Crime) प्रकार दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गेल्या दोन दिवसात दोन व्यावसायिकांना लुटल्याचे (Thief) धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. शहरातील नवीन बस स्थानका जवळील मुन्ना गॅरेजच्या ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन लॉकरमधील 21 लाख 13 हजार 630 रुपयांची रोकड चोरुन (Money Robbery) नेली आहे. 4 मार्च रोजी ही घटना घडली असून हिशोब लागत नसल्याने ही घटना उघड झाली. जमील अहमद यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. मात्र या घटनेने शहरांतील व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात गेल्या दोन दिवसात दोन व्यावसायिकांवर लुटल्याची घटना घडली. यात एका लुम कारखानदाराचे अपहरण करुन त्याला चाकुचा धाक दाखवित 28 हजारांना लुटले असनू दुसऱ्या घटनेत गॅरेज व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

पहिल्या घटनेत काय घडलं?

पहिल्या घटनेत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसऱ्या घटनेतील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आयशानगर आणि मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या घटनेत लुम कारखानदार एजाज अहमद खुर्शिद अहमद हे रस्त्याने जात असतांना दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच संशयितांना चाकुचा धाक दाखवित त्यांचे अपहरण केले. एजाज अहमद यांच्या खिश्यातील तीन हजार रुपयांची रोकड व ए.टी.एम.च्या माध्यमातून 26 हजारांची रोकड काढली. अपहरण केलेल्या एजाज अहमद यांना पुन्हा शहरातील साठ फुटी रोडवर सोडून दिले. 7 मार्च रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी त्यांनी आयशानगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. लुम कारखानदाराला 28 हजारांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी कसून शोध घेतला असून याप्रकरणी नदीम अहमद शकील अहमद, अबुबकर सिद्धीकी नगर, मालेगाव याला बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच अन्य गुन्हेगारांचा देखील शोध घेवून त्यांना बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.जी. पवार तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मोठी चोरी

तर दुसऱ्या घटनेत जमील अहमद शेख अब्दुल्ला यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या गॅरेज मधील ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन लॉकरमधील 21 लाख 13 हजार 630 रुपयांची रोकड चोरुन नेली आहे. 4 मार्च रोजी ही घटना घडली असून हिशोब लागत नसल्याने ही घटना उघड झाली. जमील अहमद यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील तपास करीत आहेत.

मुख्याध्यापकाकडून 14 वर्षे मुलींचे लैंगिक शोषण; सत्य माहिती असूनही सगळे ग्रामस्थ चिडीचूप; का ते जाणून घ्या

TET Exam Scam | एकाच एजंट ‘1126’ परीक्षार्थींना पास केल्याचं तपासात उघड; अपात्र परीक्षार्थींचा शोध सुरु

CCTV | भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा करुण अंत

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.