Malegaon : चोरीच्या वस्तू प्रवाशांना पोलिसांकडून घरपोच, 24 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
रेल्वे स्थानकावर सप्टेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास करून मनमाड रेल्वे पोलिसांनी काही जणांना अटक केली. आरोपी कडून जप्त करण्यात आलेला तब्बल 24 लाख 19 रुपयांचा मुद्देमाल मनमाड पोलिसांनी प्रवाशांना परत केला आहे.
मालेगाव – चोरीच्या घटना झाल्याच्या आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर चोरी केलेला ऐवज परत केल्याचं क्विचित ऐकायला मिळतं. पण रेल्वे (railway) एक्सप्रेसमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी (Police) तब्बल 24 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी जमा केलेला ऐवज हा विविध घटनेमधला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी प्रवाशांची खात्री पटवून त्यांचा ऐवज त्यांना परत केला आहे. त्यामुळे मनमाड(manmad) रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुद्देमाल मनमाड पोलिसांनी प्रवाशांना परत केला
रेल्वे स्थानकावर सप्टेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास करून मनमाड रेल्वे पोलिसांनी काही जणांना अटक केली. आरोपी कडून जप्त करण्यात आलेला तब्बल 24 लाख 19 रुपयांचा मुद्देमाल मनमाड पोलिसांनी प्रवाशांना परत केला आहे. त्यामध्ये सोने, चांदीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइलसह इतर वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. विशेष म्हणजे काही प्रवाशांना तर घरपोच त्यांच्या वस्तू पोहचविण्यात आल्या आहेत.रेल्वे पोलिसांनी केलेली ही कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.