Pune crime : 31 लाखांचं मेफेड्रॉन जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची पुण्यातल्या कोंढव्यात कारवाई; गुवाहाटीतल्या तरुणाला केली अटक

मागील काही दिवसांपासून मेफेड्रॉनसह गांजा आणि इतर अमली पदार्थ छुप्या पद्धतीने तस्कर विक्री करत असल्याचे आढळले आहे.

Pune crime : 31 लाखांचं मेफेड्रॉन जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची पुण्यातल्या कोंढव्यात कारवाई; गुवाहाटीतल्या तरुणाला केली अटक
अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले मेफेड्रोनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:03 PM

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात 21 लाखांचे अमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. कोंढवा परिसरातील शिवरे नगरमध्ये काल सायंकाळी छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. यात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून 171 ग्रॅम मेफेड्रोन जप्त (Mephedrone seized) करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांकडून आसामच्या एका 24 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. राहुल हितेश्वर नाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा गुवाहाटी येथील रहिवासी आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्कारांचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची विक्री या तस्करांकडून (Smugglers) होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून पुढे आले आहे. अशीच एक कारवाई काल (रविवारी) अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

गस्त घातल असताना कारवाई

राहुल हितेश्वर नाथ (वय 24, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, मूळ रा. गुवाहाटी, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी शिवनेरीनगर परिसरात एकजण मेफेड्रोनची (एमडी) विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अझीम शेख यांना मिळाली होती. त्यानंतर सापळा लावून पोलिसांच्या पथकाने आरोपीला पकडले. राहुल नाथ याच्याकडून एक दुचाकी, 31 हजार 500 रुपये, मोबाइल संच तसेच 20 लाख 52 हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

20 लाख 52 हजारांचे मेफेड्रोन जप्त

हे मेफेड्रोन नाथने कोठून आणले, कोणाला विकले, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर आदींनी केली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मेफेड्रॉनसह गांजा आणि इतर अमली पदार्थ छुप्या पद्धतीने तस्कर विक्री करत असल्याचे आढळले आहे. पोलिसांना खबर मिळताच अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई करण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.