AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला गोळी मारायची होती पण मेव्हणी मधे आली अन्..

पत्नीने पतीकडे केलेल्या एका मागणीमुळे तो भलताच भडकला आणि त्याने सरळ बायकोवर बंदूक ताणवली. तो गोळी झाडणारच इतक्याक त्याची मेव्हणी मध्ये आल्याने...

बायकोला गोळी मारायची होती पण मेव्हणी मधे आली अन्..
गोव्यातून बाईक चोरुन कोल्हापुरात विकणाऱ्या दुकलीला अटक
| Updated on: Jun 21, 2023 | 3:15 PM
Share

लखनऊ : एका सनकी पतीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीवरच गोळी (bullet fired on wife) झाडल्याची घटना घडली आहे. मात्र ऐनवेळी त्याची मेहुणी, म्हणजेच पत्नीची बहीण (sister in law died in an effort) समोर आली अन् तिचा गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर आरोपीच्या पत्नीची तब्येत अतिशय नाजूक आहे. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला असून त्याचा शोध सुरू आहे.

पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्याने रागाच्या भरात आरोपीने हे कृत्य केल्याचे समजते. हे प्रकरण हरदोईच्या निजामपूर गावातील आहे. नसीरुद्दीन असे आरोपीचे नाव असून त्याच्या पत्नीचे नाव यास्मीन आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली असून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.

दरम्यान आरोपीच्या जखमी पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे समजते. याप्रकरणी कुटुंबिय आणि आजूबाजूच्या लोकांकडे पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपी व त्याची पत्नी गेल्या वर्षभरापासून वेगळे रहात होता. त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू होता. मात्र तो वाद इतका टोकाला गेला की त्रासलेल्या पत्नीने आयुष्यभरासाठी वेगळं होण्याचा निर्णय घेत पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. यामुळे आरोपी संतापला आणि पत्नी व मेव्हणी एकटीच असल्याचे पाहून त्याने पत्नीवर अचानक हल्ला केला.

त्यांचा वाद ऐकून त्याच्या पत्नीची बहीण बचावार्थ पुढे आली असता संतापलेल्या आरोपीने बंदूक काढून गोळी चालवली. मात्र ती गोळी मेव्हणीला लागली आणि ती गंभीर जखमी होऊन खाली कोसळली. यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीच्या पत्नीला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले आणि मेहुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचा जबाब नोंदवला असून त्याचे कुटुंबिय आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली.

पत्नीची समजूत काढायला गेला होता पण भलतच घडलं…

यास्मीन व नसीरुद्दीन हे दोघेही एकाच गावचे आहेत. लग्नानंतर त्यांच्यात वाद झाल्यावर ते वेगळ रहात होते. ही घटना घडली तेव्हा यास्मीन ही तिच्या बहीणीसोबत आंबे तोडण्यासाठी बागेत गेली होती. नसीरुद्दीन हा त्याचवेळी तिथून जत असताना त्याला पत्नी एकटी दिसली व तो तिची समजूत काढण्यासाठी तिच्याजवळ गेला. मात्र त्यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आणि पत्नीने पुन्हा घटस्फोटाचा विषय काढल्यावर तो आणखीनच भडकला. संतापाच्या भरात त्याने तिच्यावर गोळी झाडली मात्र ऐनवेळी तिची बहीण मध्ये आली आणि गोळी लागून तिचा मृत्यू झाला.

बंदूकीचा आवाज ऐकताच आसपासचे लोक तिथे पोहोचले, मात्र आरोपी नसीरुद्दीन तेथून फरार झाला. स्थानिक लोकांनीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तपास सुरू केला. आरोपीच्या मेहुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून त्याच्या जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.