Mumbai Crime : धक्कादायक! मुंबईत शिक्षिकेवर बलात्कार
Mumbai Crime : आरोपीने अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले, मुंबईत कुठे घडली घटना? काय बहाण्याने आरोपी घरी घुसला? आरोपीने महिलेला काय सांगितलं?
मुंबई : मुंबईत महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण, तरीही महिलांविरोधात गुन्ह्यांची मालिका सुरुच असते. मुंबईच्या पूर्व उपनगरात चेंबूरमध्ये असाच धक्कादायक गुन्हा घडला आहे. मुंबईत एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. चेंबूरच्या RCF पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली.
13 मे रोजी हा गुन्हा घडला. आरोपीच वय 45 वर्ष आहे. पीडित महिला शिक्षिका आहे. आरोपी आणि पीडित महिला आधीपासून परस्परांचा ओळखत होते, असं पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
काय बहाण्याने आरोपी घरी घुसला?
घटनेच्या दिवशी आरोपी पीडित महिलेच्या घरी गेला होता. ट्युशन क्लासला फायनान्स करण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला. आरोपीने पीडित महिलेला सोबत नवी मुंबई येथे येण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआयने हे म्हटलं आहे.
अनैसर्गिक अत्याचार
पीडितने नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्ती केली. तिच्यावर बलात्कार केला. घटनास्थळावरुन पळून जाण्याआधी त्याने पीडित महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केला. अचानक झालेल्या या प्रकाराने महिला हादरुन गेली. तिने चार दिवसानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भारतीय दंड विधान सहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 377 (अनैसर्गिक संबंध) अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.