दोघांमध्ये प्रेमसंबंध, पण मुलीच्या वडिलांचा लग्नाला विरोध, त्याने आधी प्रेमाने मागणी घातली, नंतर भयानक घडलं
प्रेमात त्याग, समर्पण असतं. ते ओढून ताणून किंवा हिसकावून घेण्यासारखं नसतं. मात्र, हीच गोष्ट काही तरुणांना समजत नाही (man killed his girlfriends father).
लखनऊ : प्रेम ही संकल्पना आजकालच्या तरुणांना फारसी उमगताना दिसत नाहीय. प्रेमात त्याग, समर्पण असतं. ते ओढून ताणून किंवा हिसकावून घेण्यासारखं नसतं. मात्र, हीच गोष्ट काही तरुणांना समजत नाही. त्यामुळे त्यांच्या हातून एखाद्यावेळी भयानक गुन्हा देखील घडू शकतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेली येथे घडला आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला म्हणून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत (man killed his girlfriends father).
नेमकं प्रकरण काय ?
नरेली रसूलपूरच्या राम भरोसे यांच्या मुलीचे आनंदपूर गावाच्या श्रीपाल याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचं होतं. त्यासाठी श्रीपाल हा मुलीच्या वडिलांकडे तिचा हात मागण्यासाठी गेला. श्रीपाल हा शनिवारी (27 मार्च) दुपारी दोन वाजता मुलीच्या घरी गेला. तिथे त्याने मुलीच्या कुटुबियांकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण यावरुन मुलीचे वडील राम भरोसे नाराज झाले. त्यांनी लग्नाला नकार दिला. मुलीच्या कुटुबियांनी देखील श्रीपाल याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा ऐकत नव्हता.
श्रीपालने मुलीचा हात पकडला आणि तिला बाईकने आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तो तिला जबरदस्ती आपल्यासोबत घेऊन जात होता. यावेळी मुलीच्या वडिलांनी त्याला विरोध केला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून श्रीपालने तिथे बाजूला पडलेला रॉड उचलून मुलीच्या वडिलांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात मुलीचे वडील राम भरोसे रस्त्यावर पडले आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
आरोपी श्रीपाल फरार
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत श्रीपाल हा घटनास्थळावरुन फरार झाला होता. राम भरोसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपीला पकडण्यासाठी एक पथक रवाना केलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली (man killed his girlfriends father).
हेही वाचा : Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…