आधी दोन निष्पाप पोटच्या मुलांचा बळी घेतला, नंतर विहिरीत फेकलं, जन्मदात्या पित्याने निघृण कृत्य का केलं?

एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलांचं डोकं फोडलं. त्यानंतर त्यांना विहिरीत फेकून दिलं (Man killed his two son and commits suicide).

आधी दोन निष्पाप पोटच्या मुलांचा बळी घेतला, नंतर विहिरीत फेकलं, जन्मदात्या पित्याने निघृण कृत्य का केलं?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 4:43 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलांचं डोकं फोडलं. त्यानंतर त्यांना विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर त्याने स्वत:चा गळा चिरला आणि विहिरीत उडू मारुन आत्महत्या केली. संबंधित घटना ही झांसी जिल्ह्याच्या मऊरानीपूर पोलीस ठाणे हद्दीतील रानीपूर या भागात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे (Man killed his two son and commits suicide).

नेमकं प्रकरण काय?

रानीपूर येथे वास्तव्यास असलेलेल्या रहीश नावाच्या व्यक्तीचं घरात आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. विशेष म्हणजे रहीश याला दारुचं व्यसन होतं. तो दारु पिवून घरात पत्नीसोबत दररोज भांडण करायचा. त्यामुळे घरात अजिबात शांतता नसायची. दोघांना दोन मुलं होती. त्यामध्ये 12 वर्षीय मुलाचं नाव हर्ष तर 9 वर्षीय मुलाचं नाव अंश असं होतं. रहीशने या दोन्ही मुलांची हत्या केली (Man killed his two son and commits suicide).

पत्नीसोबतच्या भांडणानंतर टोकाचं पाऊल

रहीश याचं त्याच्या पत्नीसोबत शनिवारी (22 मे) कडाक्याचं भांडण झालं. भांडण शांत झाल्यानंतर तो हर्ष आणि अंश या त्याच्या दोन्ही मुलांना नवे कपडे घेऊन देतो सांगत बाजारात घेऊन गेला. मात्र, अर्ध्या वाटेतच त्याने मुलांच्या डोक्यावर दगड आपटत हत्या केली. त्याने दोन्ही मुलांना जवळच्या विहिरीत फेकून दिलं. त्यानंतर त्याने चाकूने स्वत:चा गळा चिरला आणि विहिरीत उडी टाकली.

कुटुबियांची शोधाशोध

रहीश संध्याकाळ झाल्यानंतर आपल्या मुलांना घेऊन घरी आला नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच्या पत्नीने आणि इतर नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, कुठेही ते सापडत नव्हते. दरम्यान, शहरातील केदारेश्वर मंदिराजवळ एका विहिरीजळ रक्ताने माखलेल्या अर्धवट विटा काही शोधकर्त्यांना दिसल्या. त्यांनी बाजूला असलेल्या विहिरीत बघतलं तर तिथे रहीश आणि त्याच्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले.

पोलिसांकडून तपास सुरु

संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा : वडिलांवर हात उगारणारा मुलगा, आधी शिविगाळ, नंतर कानशिलात लगावली, कारण…………

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.